https://www.amazon.in/bb/registration/start/?_encoding=UTF8&ref_=cct_cg_12345_1a1&pf_rd_p=9acff4bf-eee0-4854-9cca-99af421dadcf&pf_rd_r=HJNTZM43QKTMGKZ3FXDN

“हे सरकार प्रमाणपत्र देत नाही... म्हणून मी करंटला धरून जीवन संपवतोय”



 “हे सरकार प्रमाणपत्र देत नाही... म्हणून मी करंटला धरून जीवन संपवतोय”


मुलांच्या शैक्षणिक लाभासाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या पित्याची आत्महत्या – दादगी गावात हळहळ


लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावात शिवाजी वाल्मिक मेळ्ळे (३२) या तरुणाने जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. शनिवारी संध्याकाळी त्यांनी विजेच्या करंटाचा धक्का घेत जीवन संपवले.


मेळ्ळे यांनी वर्षभरापूर्वी मुलांसाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, प्रमाणपत्र न मिळाल्याने मुलांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या. कुटुंबाची जबाबदारी आणि मानसिक तणाव यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.


त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे –

“माझे दोन लेकर शिकायला आहेत... मी मजुरी करून घर चालवत आहे... लेकराला महादेव कोळ्याचं प्रमाणपत्र मिळत नाही... हे सरकार प्रमाणपत्र देत नाही... म्हणून मी करंटला धरून जीवन संपवतोय.”


या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून, कोळी महादेव समाजाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीबाबत शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

   

  मागील दोन वर्षापासून या भागांमध्ये सातत्याने मल्हार कोळी आणि महादेव कोळी समाजाने उर्वरित महाराष्ट्र राज्य लागू असेलेले निकष आहेत तेच निकष लावून आम्हाला जात प्रमाणपत्र देण्यात यावेत.. व्हॅलिडीटी सोपी आणि सहज करावी यासाठी आंदोलन उभं केलं होतं. 17 तारखेला मराठवाडा भर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर ही आत्महत्या आंदोलनाला आणखीन तीव्र करेल अशी चिन्ह आहेत.


Post a Comment

0 Comments