एक कोटी रुपया साठी दुसऱ्या व्यक्तीचा जाळून खून करून तो जळालेला व्यक्ती स्वतः असल्याचा बनाव करणारा इसमास लातूर पोलीसांनी 24 तासामध्ये केले जेरबंद




एक कोटी रुपया साठी दुसऱ्या व्यक्तीचा जाळून खून करून तो जळालेला व्यक्ती स्वतः असल्याचा बनाव करणारा इसमास लातूर पोलीसांनी 24 तासामध्ये केले जेरबंद लातूर पोलिसांचे कार्यवाही.

1) पोलीस ठाणे औसा.

2) गु.र.नं.- 521/2025 कलम 103(1), 238 बी.एन.एस.

3) फिर्यादीचे नाव :- अतुल विठठलराव डाके पोलीस उपनिरीक्षक औसा पो.स्टे.

4) गुन्हा घडला ता.वेळ :- दि. 13/12/2025 रोजी 23:30 वाजताचे सुमारास

5) गुन्हा दाखल ता.व वेळ:- दि.15/12/2025 रोजी 16:47 वा.

6) गुन्हा घडला ठिकाण: वानवडा पाटी ते वानवडा जाणारे रोडवर अगरवाल याचे शेताजवळ औसा शिवार औसा ता. औसा जि. लातुर

7) आरोपी :- गणेश गोपीनाथ चव्हाण रा.विठठल नगर औसा

8) तपास अधिकारी आर. के. डमाळे पोलीस निरीक्षक पो.स्टे. औसा

9) थोडकयात हकिकतः-

दि.14/12/2025 रोजी रात्री 00:30 वाजताचे सुमारास डायल 112 हेल्पलाईन कॉल प्राप्त झाला की वानवडा पाटी ते वानवडा जाणारे रोडवर एका गाडीला आग लागली आहे त्याआधारे पोलीस स्टेशन औसा येथील रात्रपाळीचे अधिकारी व अमलदार सदर ठिकाणी पोहचले. त्यांनी अग्निशमन दलाचे वाहनास पाचारण करुन सदरची आग विजवली व गाडीमध्ये पाहणी केली असता नमुद गाडीमध्ये एक मानवी हाडाचा सांगाडा अर्धवट जळालेल्या स्थितीत दिसुन आला सदर ठिकाणी असलेल्या सांगाडयावरुन पोलीस स्टेशन येथे औसा अकस्मात मृत्यु क्र. 72/2025 कलम 194 बी.एन.एस.एस. प्रमाणे दाखल करुन अधिकचा तपास सुरु केला. त्याप्रमाणे सदरचे हाडाचे सांगाडयाचा पोस्टमार्टम जागीच वैदयकिय अधिकारी बोलावुन केले असून प्रेताची ओळख पटविण्याकरीता डी.एन.ए. सॅम्पल काढुन ठेवण्यात आले आहे.

सदरचे घटनास्थळावर जळालेल्या गाडीचा क्रंमाक एम.एच.43 ए.बी.4200 असा दिसत असल्याने सदरचे गाडीचे मालकाचा शोध घेतला असता सदरचे वाहन हे बळीराम गंगाधर राठोड रा. औसा तांडा ता. औसा याचे नावावर असल्याचे निष्पन्न झाले सदरचे वाहन हे त्याचा मेव्हणा गणेश गोपीनाथ चव्हाण रा. विठठल नगर औसा हा वापरत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे गणेश चव्हाण याचा शोध घेतला असता तो दि. 13/12/2025 चे रात्री 10:00 वाजता मित्राला लॅपटॉप देण्याचे कारणाने बाहेर गेला असून अदयाप पावेतो आलेला नसल्याचे माहिती त्याची पत्नीने दिली.

सदरचे घटनास्थळावर जळालेल्या गाडीतुन प्राप्त झालेल्या हातातील परिधान करावयाचे कड्यावरुन सदरचा मयत हाडाचा सांगाडा हा गणेश चव्हाण याचा असल्याचे त्याचे नातेवाईकांनी ओळखुन सांगितल्याने सदरचा मृतदेह हा परत ओळख पटवण्याचे अनुषंगाने पुरण्याचे अटिवर गणेश चव्हाण याचे नातेवाईकाचें ताब्यात देण्यात आला होता.

त्यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व औसा पोलीस ठाणे यांचे संयुक्त तपासादरम्यान इसम नामे गणेश चव्हाण हा जिवंत असल्याचा संशय बळावल्याने तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे माहिती मिळाली त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील पथकाने गणेश चव्हाण याचा पाठलाग करून त्यास विजयदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथुन ताब्यात घेतले.

गणेश चव्हाण यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांने कबुल केले की तो मागील एक ते दिड वर्षापासुन आर्थीक अडचणी मध्ये असल्याने तसेच त्याने मागील तिन वर्षापासुन एक कोटीचा टर्म इन्सुरन्स काढलेला असुन त्याचेवर सुमारे सत्तावन्न लाख रुपये कर्ज आहे. सदरचे कर्ज फेडण्यासाठी तो मागील एक महिण्यापासुन स्वत आत्महत्या करण्याचा किंवा इतर एखादया व्यक्तीचा खुन करुन तो स्वतःचा असल्याचा बनाव करण्याचा विचार करत होता. असे केल्यास ईन्सुरन्सचा लाभ कुंटुंबाला मिळेल व त्याने काढलेले कर्ज निल होईल असा त्याचा विचार होता.

त्याप्रमाणे दिनांक 13/12/2025 रोजी रात्री 10:00 वाजण्याचे सुमारास तो घरातुन बाहेर पडला. तो याकतपुर रोड चौक औसा येथे आला असता त्याचे स्कोडा गाडीला इसम नामे गोविंद किशन यादव वय 50 वर्षे रा. पाटील गल्ली, औसा यांनी हात दाखवुन लिफ्ट मागीतल्याने गणेश चव्हाण याने गाडी थांबवली. सदर व्यक्ती यास गणेश चव्हाण यांनी गाडीमध्ये बसवले. त्यावेळी सदर व्यक्तीने औसा किल्ला जवळ सोडण्यास सांगीतले. तेव्हा तो व्यक्ती हा पुर्ण दारुचे नशेत होता त्यावेळी गणेश चव्हाण याचे मनात कुंटुंबाला टर्म ईन्सुरन्स रक्कम मिळणे करीता व कर्ज माफ व्हावे यासाठी त्याला मारुन स्वतः मयत झालो असा दाखविण्याचा बनाव करण्याचा विचार आला, त्यामुळे गणेश चव्हाण यांने गोविंद यादव यास काही खाणार का असे विचारणा केली असता चिकन खातो असे सांगीतले. त्यानंतर एका ढाब्यावरुन त्याचे साठी चिकन घेतले व गणेश चव्हाण याने वानवडा पाटी ते वानवडा जाणारे रोड ला गाडी घेवुन काही अतंराबर जावुन गाव व घरे किती अंतरावर आहेत याचा अंदाज घेतला. तसेच गाडी परत वळवुन आणुन वानवडा जाणारे रोडला लावली. त्यानंतर गोविंद यादव यास चिकन खाण्यासाठी दिले. त्याने थोडे चिकन खावुन नंतर खाण्यास नकार देवुन तो गाडीमध्ये झोपी गेला. तेंव्हा गणेश चव्हाण याने उरलेले चिकन डब्बासह बाजुचे शेतात फेकले. तसेच गोविंद यादव याचे खिशातील देशी दारुचे बाटल्या काढुन घेताना एक बाटली अंधारात खाली पडली.

सदर ठिकाणी गणेश चव्हाण याने बाजुस बसलेला गोंविद यादव यास डायव्हर शिटवर ओढुन बसवले व शिट बेल्ट लावला. ड्रायव्हर शिटचे बाजुचे शिटवर सोबत असलेल्या माचीस (काड्यापेटया) तील सर्व काडया एकत्र करुन शिटवर टाकल्या तसेच पेट घेणेसाठी प्लास्टीक पिशव्या शिटवर टाकुन काडी ओढुन पेटवले. व जाताना लवकर पुर्ण गाडीने पेट घ्यावा म्हणुन पेट्रोल टाकीचे झाकन उघडुन ठेवुन निघुन गेला नंतर तो तुळजापुर मोड या ठिकाणी पायी चालत आला त्या ठिकाणाहुन गणेश चव्हाण हा शर्मा ट्रॅव्हल्सने कोल्हापुर या ठिकाणी गेला. तेथुन पुढे एस.टी. ने विजयदुर्ग या ठिकाणी गेला. वगैरे वरील प्रमाणे हकीगत सांगुन गुन्हा केल्याची कबुली दिली त्यावरुन अकस्मात मृत्युचे तपास अधिकारी पोउपनि डाके यांचे फिर्यादी वरुन इसम नामे गणेश गोपिनाथ चव्हाण याचे विरोधात औसा पोलीस ठाणे येथे खुन करुन पुरावा नष्ट केला म्हणुन गु.र.नं. 521/2025 कलम 103(1), 238 बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत. अतिशय हुशारीने ईन्शुरन्सचे एक कोटी रुपये मिळण्यासाठी व सत्तावन लाख रुपयेचे कर्ज माफ होण्यासाठी आरोपीने खुन करुन स्वतः आत्महत्या केल्याचा बनाव केला होता सदरचा बनाव हा लातूर पोलीसांच्या सर्तकतेने 24 तासाचे आत उघडकिस आला आहे.

सदरचा तपास हा पोलीस अधिक्षक मा. श्री. अमोल तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कुमार चौधरी याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सहा. पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ सोबत पोलीस अंमलदार अर्जन राजपुत, महादेव बिल्लापटे, युवराज गिरी, तुराब पठाण, रामलिंग शिंदे, नवनाथ हासबे, सर्जेराव जगताप, राजेश कंचे, श्रीनिवास जोंधळे व औसा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रेवणनाथ डमाळे, पोउपनि अतुल डाके, पोउपनि भाऊसाहेब माळवदकर सोबत पोलीस अंमलदार मोतीराम घुले, रामकिशन गुटटे, मुबाज सय्यद, हनमंत पडिले, दिनेश गवळी, अशोक राठोड, रतन शेख, येणकुरे, महेश मर्डे, बालाजी चव्हाण, भरत भुरे, महेश क्षिररसागर, सोमनाथ खडके, बालीका सरवदे, सदाशिव दंतुरे, सचिन मंदाडे, भागवत गोमारे, सुर्यकांत मगर, गोंविद पाटील व सायबर पोलीस स्टेशनचे शैलेश सुडे, मपोकों अंजली गायकवाड यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments