Ajit Pawar Dead Plane Crash Baramati: पहिल्यांदा वरुन गेलं, मग खालून...; अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला?, प्रत्यक्षदर्शीने सगळं सांगितलं

 


Ajit Pawar Dead Plane Crash Baramati: पहिल्यांदा वरुन गेलं, मग खालून...; अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला?, प्रत्यक्षदर्शीने सगळं सांगितलं


Ajit Pawar Dead Plane Crash Baramati: महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार (Ajit Pawar Dead) यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. (Ajit Pawar Dead Baramati Plane Crash)

नेमकं काय घडलं? (Ajit Pawar Dead)

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मुंबईहून बारामतीसाठी आज सकाळी विमान निघालं होतं. यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसह अन्य सहाजण देखील विमानात होते. परंतु विमानाचा अपघात इतका भीषण होता की, अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. (Ajit Pawar Dead Baramati Plane Crash)

नेमकं काय घडलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं- (How did Ajit Pawar plane crash happen?)

अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्याठिकाणचे प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक माहिती दिली आहे. पहिल्यांदा विमान वरुन गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं. नंतर विमान फिरलं आणि खाली जमीनीला लागलं, तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झाला, असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. 

विमानात कोण कोण होते? (Ajit Pawar Dead Baramati Plane Crash)

  1. अजित पवार
  2. विदीप जाधव
  3. पिंकी माळी
  4. कॅप्टन सुमित कपूर
  5. कॅप्टन शांभवी पाठक

विमान अपघात कसा झाला, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, VIDEO:

Post a Comment

0 Comments