लातूरात संदल मिरवणुकीदरम्यान धक्का लागल्याने एकाचा खून
लातूर : 2 फेब्रुवारी च्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मारवेल जीम समोर ताजोद्दीन बाबा दर्गाह रोड लातूर येथे संदल मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून एका तरूणाने दुसर्या तरूणाच्या पोटात चाकू भोसकून त्याचा खून केल्याचा प्रकार लातूर शहरामध्ये घडला आहे. घटना घडताच काही काळ तणावाची स्थिती होती. पोलीस अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बंदोबस्त ठेवला. हत्या झालेल्या तरूणावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
काल संदल मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीमध्ये अनेक तरूण नाचत होते. या
दरम्यान धक्का लागला म्हणून फैजान आरीफ कुरेशी (वय 18 वर्ष) रा. भोई गल्ली लातूर याच्यात व जैद जावेद सय्यद रा. बौद्ध नगर लातूर या दोघांत बाचाबाची झाली. यातूनच जैद सय्यद याने फैजान आरीफ कुरेशी याच्या पोटात चाकू खुपसून त्याचा खून केला. या प्रकारानंतर काहीसा तणाव निर्माण झाला होता. तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी, संबंधीत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळ व इतर ठिकाणी चौख बंदोबस्त ठेवला. मयताचे शवविच्छेदन करण्यात आले. आज सकाळी मयत फैजान आरीफ कुरेशीवर याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी पोलीस बंदोबस्त होता. या प्रकरणी मयताचा भाऊ रेहान आरीफ कुरेशी याच्या फिर्यादीवरून जैद जावेद सय्यद रा. बौद्ध नगर लातूर याच्या विरोधात विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात भादंवि 302, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून विवेकानंद चौक पोलिसांनी जैद सय्यद यास अटकही केली आहे.