दिवसभरातील ताज्या घडामोडी





दिवसभरातील ताज्या घडामोडी 


👍 अमरावती पदवीधरमध्ये धीरज लिंगाडेंचा विजय :


अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील यांचा विजय झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. रणजित देशमुख यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.    


😇 प्रश्नपत्रिका मोबाईलवर फॉरवर्ड कराल तर परीक्षेला मुकाल :


यंदा दहावी बारावीच्या परीक्षेचे नियम कडक करण्यात आले आहेत. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि विकत घेतल्यास किंवा मोबाईल अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यास पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. शिवाय परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 


🗣️ अजित पवार यांचा सत्यजीत तांबे यांना सल्ला :


नाशिक पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे निवडून आल्यानंतर काँग्रेस आणि भाजपही त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करणार पण त्यांना स्वत:चं राजकीय भवितव्य आहे हे त्यांनी पाहावं, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यात बोलत होते. 


🔎 सत्यजित तांबेंना पुन्हा काँग्रेसमध्ये घेणार? :


“नाशिकमध्ये आमच्यासोबत डॉ. सुधीर तांबे यांनी विश्वासघात केला. या मतावर मी आजही ठाम आहे. सत्यजित तांबे यांनी उमेदवारी द्यावी, असे त्यांनी आम्हाला सांगितले असते, तर आम्ही सत्यजित यांना उमेदवारी दिली असती. आमचा तेथे विश्वासघात झालेला आहे. येथे भाजपाने खेळी केलेली आहे. बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे निवडून येणार असे भाजपाचे अनेक नेते, मंत्री म्हणत होते. हे भाजपाने नियोजनबद्धपणे केले होते, हे कोणालाही नाकारता येणार नाही. त्यांना पक्षात घ्यायचे की नाही, याचा निर्णय हायकमांडच घेईल,” असे नाना पटोले यांनी सांगितले.


😎 भाजपचे उमेदवार आज रात्री घोषित होणार :


कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेवारांची नावे आज संध्याकाळपर्यंत, रात्री उशिरा दिल्लीतून घोषित होतील, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. महायुतीमधल्या घटक पक्षांचा या निवडणुकीबाबत मेळावा झाला. या मेळाव्याला सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post