सहाय्यक पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्या पथकाची ३३ जणांवर कारवाई
लातूर : पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूरचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे
निलंगा शहरात अवैध स्वरूपात चालू असलेल्या ४ जुगार अड्ड्यावर एकाचवेळी छापा मारून ३३ जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले असून त्यांच्याकडून २.९४ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
काल निलंगा येथे वेगवेगळ्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये, तसेच रूम मध्ये काही इसम मटका नावाचा जुगार खेळत आहेत. अशी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर यांनी निलंगा येथील शिवाजी चौक ते बँक कॉलनी जाणारे रोडवर, बँक कॉलनी परिसरात, औराद ते निलंगा जाणारे रोडवरील परिसरात, पिराजी नवनाथ कांबळे यांचे पत्र्याच्या घरामध्ये अशा चार ठिकाणी
एकाच वेळी छापेमारी करून बेकायेशीररित्या मटका जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आल्याने एकूण ३३ इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख ९४ हजार ५९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माजिद अब्दुलगणी खडके रा. निलंगा, बालाजी प्रभू गायकवाड रा. जेवरी, भगवान माधव वाडीकर मसोबाचीवाडी, समदानी जाफर सौदागर रा. निलंगा, शहाबाद उस्मान पठाण रा. निलंगा, इरफान शेख रा. निलंगा, वाजिद रुक्मोदिन पठाण रा. मुबारकपूर निलंगा, ज्ञानोबा बाजीराव गवारे रा. केळगाव, ज्ञानेश्वर मल्हारी त्रिमुखे रा. पेठ
निलंगा, रियाज नुरुद्दीन कुरेशी रा. निलंगा, नितीन यादव कांबळे रा. निलंगा, ऋषिकेश लक्ष्मण कांबळे रा. रामेगाव, ता. औसा, विशाल अंकुश कांबळे रा. पेठ निलंगा, अख्तर रुक्मुद्दीन फकीर, महेबूब रुक्मुद्दीन फकीर दोघही रा. पीरपाशा दर्गा रोड, निलंगा, विठ्ठल व्यंकटराव माने, रा. अनसरवाडा ता. निलंगा, कृष्णा शिवाजी पोतदार रा. बँक कॉलनी, निलंगा, उल्हास शिवलिंगप्पा दिवटे रा. दुर्गा नगर, महारुद्र चौक, निलंगा, विक्रम किशनराव शेंडगे रा. गांधीनगर, निलंगा, शंकर गोपाळ हिरास, वय २७ वर्ष, राहणार महारुद्र चौक निलंगा, संदीप सुरेश गाडचिले रा. हनुमंतवाडी ता. निलंगा, उद्धव राजाराम पवार रा. जामगा ता. निलंगा, लक्ष्मण श्रीपती बोयने रा. लिंबाळा, ता.
निलंगा, श्याम वसंत वरंगले रा. जाऊवाडी, ता. निलंगा, टिल्लू नीला, रा. आदर्श कॉलनी निलंगा, संतोष भगवान कांबळे, सागर रामू क्षीरसागर दोघेही रा. वीर लहुजी साळवे नगर निलंगा, ज्ञानेश्वर राम सुरवसे रा. सिंदखेड ता. निलंगा, विलास निवृत्ती शेळके रा. रामेगाव ता. औसा, महादेव शिवाजी मदने रा. माळी गल्ली निलंगा, भीमा राजेंद्र कांबळे रा. वीर लहुजी साळवे नगर निलंगा, अनिल पुरुषोत्तम नितनवरे रा. इंद्रा चौक निलंगा, संतोष महादेव कांबळे, रा. वीर लहुजी साळवे नगर निलंगा असे असून वरील आरोपी मटका नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले आहेत.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून काल पोलीस ठाणे निलंगा येथे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे नेतृत्वातील पथकातील पोलीस अधिकारी /अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे. पुढील तपास निलंगा पोलिस करीत आहेत.
No comments:
Post a Comment