मुरुड येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न

 मुरुड येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न

मुरुड प्रतिनिधी :- ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी डॉ. कमलदीप कासार ,डॉ. सौ. शरयू कासार सुसज्ज असे कासार हॉस्पिटल अँड सर्जिकल सेंटर मुरुड येथे भरले आहे. आता हेच हॉस्पिटल गरिबांना आधार देणारे हॉस्पिटल म्हणून ओळख होत आहे. आजारावरील योग्य निदान व उपचार व्हावे ,यासाठी प्रयत्न करत आहेत.

तसेच प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. नवनिर्वाचित (उपसरपंच) हनुमंत बापू नागटिळक व महेश भैय्या कणसे (ग्रा. पं. सदस्य),अनंत भैय्या कणसे (ग्रा. पं. सदस्य), सचिन घोडके, वैजिनाथ हराळे आदि मान्यवरांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले .

तसेच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अमित कासार, शरद पाडुळे, विलासराव कासार गावातील नागरिक व प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.


मुरूड कासार हॉस्पिटल अँड सर्जिकल सेंटर हे गेल्या वर्षभरापासून परिसरातील नागरीकांसाठी सेवा देत असून हॉस्पिटल मध्ये सर्दी,ताप,खोकल्या सोबतच मुळव्याध, भगंदर, हर्निया, हायड्रोसिल, लघवीचे आजार, गर्भाशयाचे आजार, पोटाचे आजार, शरीरांवरील विविध प्रकारच्या गाठी, स्रीयांचे मासीक पाळीचे आजार, केस गळती, चेहऱ्यावरील पिंपल्स, पायातील कुरुप, मानपाठ व कंबर दुखी आदि विविध आजारांवर औषधौपचार व ऑपरेशन उपचार लातूर शहरांपेक्षा अगदि अल्प दरात उपलब्ध आहेत. कासार हॉस्पिटल अँड सर्जिकल सेंटरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त डॉ. कमलदीप कासार व डॉ. सौ. शरयू कासार यांनी हे शिबीर आयोजित केले होते. या शिबिराचा लाभ मुरुड, बोरगाव, करकट्टा, नायगाव, जागजी, तेर, ढोकी, भोपला, गुंफावाडी, तावरसखेडा, कोंड तसेच विविध ११८ रुग्णांनी उपस्थित राहून लाभ घेतला.







Post a Comment

Previous Post Next Post