मुरुड पोलीस स्टेशनच्या नोटीसांना गणेश मंडळांकडून केराची टोपली.!
मुरुड पोलीस स्टेशनच्या नोटीसांना गणेश मंडळांकडून केराची टोपली..!
77 गणेश भक्तावर पोलिसांनी कार्यवाही केल्यामुळे मुरुड बंद
मुरुड : येथील गणेश मंडळांना मिरवणुकीच्या संदर्भात पोलीस प्रशासनाने डीजे मुक्त मिरवणूक काढून सहकार्य करावे अशा नोटीसा गणेश मंडळांना दिल्या होत्या या नोटीसाना केराची टोपली दाखवत गणेश मंडळांनी डीजे लावून मिरवणूक साजरी केली. यासंदर्भात पोलीस प्रशासनाने गणेश मंडळावर व कार्यकर्त्यांवर 77 गणेश भक्तावर कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीचा निषेध म्हणून मुरुडच्या व्यापाऱ्यानी बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदविला आहे.
पोलिसांनी केलेल्या कार्यवाही करण्यात आली सदर आरोपीनी डी जे डाॅल्बी वाजवुन मा न्यायालयाने घालुन दिलेल्या मर्यादेपेक्षा मोठया करकर्कश आवाजात गाणे वाजवुन नियमाची पायमल्ली करून तसेच जिल्हाधिकारी तथा दंड अधिकारी ,पोलीस अधिक्षक लातुर यांचे आदेशाचे व दिलेल्या कलम 168 बी.एन.एस.एस.नोटीसचे उल्लंघन केलेले आहे.तसेच मिरवणुकीवेळी डी जे डॉल्बी असलेले वाहन रस्त्यात लावुन सार्वजनिक वाहतुकीस आडथळा निर्माण केल्यामुळे गुन्हा क्रमांक.306/25 क 223,285,भा.न्या.सं.सह कलम 36/134 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार कार्यवाही करण्यात आलेली आहे.
गैरकायदयाची मंडळी जमवुन मोठ मोठयाने आरडाओरड करुन पोलीस स्टेशन येथे लावलेले डी जे डॉल्बी सोडुन देण्याची मागणी करुन पोलीस स्टेशन समोरुन जाणारे काही मंडळाचे कार्यकर्ते यांचेसह रोडवर थांबुन लातुर ते बार्शी रोडने जाणारे वाहने आडवुन पोलिसासोबत हुज्जत घालुन झटापट करुन पोलीस स्टेशन येथे लावलेले डी जे डॉल्बी घेवुन जावुन कर्तव्य पालन करत असलेल्या शासकिय कामात आडथळा निर्माण केल्यामुळे मुरुड येथे गुन्हा क्रमांक.307/25 क कलम 132,126(2),189(2),191(2),भा.न्या.सं.सह कलम 135 म.पो.का.अन्वये कार्यवाही करण्यात आलेली आहे
.
सदरील गावातील बड्या नेत्याचे असे म्हणणे आहे की, शासन ,प्रशासन यांनी कायद्यामध्ये काही बदल करावी लागते की जेणेकरून इतर नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये व कायद्याचे योग्यरित्या पालन व्हावे, योग्य असा मधला मार्ग काढावा असे मत व्यक्त केले.
0 Comments