एस.टी. बोर्डवरून ‘जय महाराष्ट्र’ शब्द हटवला; विशाल कणसे यांचा संघर्ष अखेर यशस्वी!
मुरुड (प्रतिनिधी) :- मुरुड येथील बस स्थानकावरील बॅनर वर जय महाराष्ट्र नाव वगळण्यात आले होते त्या अनुषंगाने विशाल कणसे यांनी सदरील आमदार, खासदार ,मंत्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला व मेसेजच्या माध्यमातून त्यांना त्या गोष्टीची मागणी करून त्याचे गांभीर्य लक्षात आणून दिले असता सदर या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली सदरील या संदर्भात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, एसटी महामंडळ व कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून नजरचुकीने हा प्रकार घडल्याचा त्यांनी उघड पणे म्हटले आहे अशी माहिती विशाल कणसे यांनी दिली. एसटी महामंडळाच्या बोर्डवरून ‘जय महाराष्ट्र’ हा शब्द वगळल्याने संतप्त झालेल्या विशाल कणसे यांनी तात्काळ आमदार आणि खासदारांशी संपर्क साधून तीव्र पाठपुरावा केला. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी सातत्याने आवाज उठवत अखेर हा मुद्दा मार्गी लावण्यात यश मिळवले.
कणसे यांच्या या संघर्षामुळे पुन्हा एकदा ‘जय महाराष्ट्र’ शब्दाचा सन्मान राखला गेला आहे. स्थानिक तरुणांनी त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत करत.
“मराठी अस्मितेचा प्रश्न असेल तर मागे हटणार नाही,” अशी ठाम भूमिका विशाल कणसे यांनी व्यक्त केली
0 Comments