विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून मेहनत घेतल्यास यश तुमचेच ः डॉ. दीपक बच्चेवार





 विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून मेहनत घेतल्यास यश तुमचेच ः डॉ. दीपक बच्चेवार


विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून मेहनत घेतल्यास यश तुमचेच ः डॉ. दीपक बच्चेवार
कॉक्सिटमध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक
लातूर- विद्यार्थ्यांनी कोणतेही ध्येय निश्‍चित करून ते प्राप्त करून घेण्यासाठी योग्य नियोजन करावे, ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली तर कोणतेही यश तुमच्या मागे धावत येईल, असा आशावाद नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. दीपक बच्चेवार यांनी व्यक्त केला.
येथील कॉक्सिट महाविद्यालयाचे १२ विद्यार्थी २०२३-२४ मध्ये झालेल्या परीक्षेत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. त्यांचा व पालकांचा सत्कार कॉक्सिटमध्ये करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बच्चेवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. एम. आर. पाटील होते. यावेळी कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव, माजी प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य डॉ. डी. आर. सोमवंशी, ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. कैलास जाधव, डॉ. डी. एच. महामुनी, प्रा. सुषमा मुंडे, डॉ. नितीन वाघमारे यांची उपस्थिती होती.
डॉ. दीपक बच्चेवार म्हणाले, डॉ. एम. आर. पाटील यांनी सन २००० मध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना सगंणकीय शिक्षण मिळण्यासाठी कॉक्सिटची स्थापना केली. अतिशय कष्टातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम केले, हजारो विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील नोकर्‍या मिळवून दिल्या. आज संगणकीय शिक्षण देणारी अनेक महाविद्यालये ओस पडली आहेत. कॉक्सिटमध्ये प्रवेशासाठी मात्र प्रतीक्षा करावी लागते. डॉ. एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग मेहनत घेत आहे. यामुळे स्थापनेपासून आतापर्यंत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी झळकत आहेत. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःचे ध्येय निश्‍चित करावे, त्यानुसार योग्य नियोजन करून ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी, यश तुमची वाट पाहात आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. डी. आर. सोमवंशी यांनी केले. प्राचार्य विनायक जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post