जयहिंद लोकसंचलीत साधन केंद्राची 14 वी वार्षिक सर्व साधारण सभा मोठ्या उत्साहात
आज दिनांक 09/10/2025 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय लातूर अंतर्गत जयहिंद लोकसंचलीत साधन केंद्राची 14 वी वार्षिक सर्व साधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली, या सभेस उपस्थित मान्यवर सभेचे प्रमुख कार्यक्रमाचे उद्घाटक मा.सौ वनिता पाटील मॅडम प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.सोमनाथ लामगुंडे सर (जिल्हा समनव्य अधिकारी माविम लातूर) CMRC(उपअध्यक्ष) श्रीमती सुलचना उपाडे, मॅडम ,लिंबाबाई कांबळे मॅडम ,CMRC(सचिव) श्रीमती मीनाताई दिवे मॅडम मा.श्री राहुल लोंढे , (आर एच एस) ,शुभम डोके सर ICICI बँक लातूर),मा. श्री विजयकुमार स्वामी सर (AO माविम लातूर), मा.श्री.भरत काळे सर, संदीप नेवले सर (HDFC बँक लातूर).श्री हितन कुऱ्हे सर (जिल्हा प्रकल्प अधिकारी माविम) श्री अनंत हेरकर सर (MIS सल्लागार माविम )लातूर,SOS बालग्राम चे नंदा सर,SBI RESETI लातूर चे संचालक सेतू सर, SIDBI चे संतोष सर ,आदित्य बिर्ला ग्रुप चा लातूर जिल्हा समनव्यक अमृता पाटील,श्रीमती सुजाता तोंडारे मॅडम (एकता लोकसंचलीत साधन केंद्र व्यवस्थापक),लेखापाल प्रवीण जगताप सर,श्रीमती उषा डुमने (सावित्रीबाई फुले लोकसंचलीत साधन केंद्र, रेणापूर व्यवस्थापक ) सौ.सविता पाटील मॅडम,(जयहिंद लोकसंचलीत साधन केंद्र लातूर पूर्व व्यवस्थापक) सर्व कार्यकारणी संचालक मंडळ ,CMRC स्टाफ, सहयोगिनी,CRP स्टाफ व बचत गटातील
900 महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्तविक सहयोगिनी शोभा घोलप यांनी केले. त्यानंतर प्रास्तविक CMRC व्यवस्थापक सविता पाटील यांनी केले,त्यानंतर मा.श्री.भरत काळे सर (RHS HDFC बँक लातूर) मार्गदर्शन केले नंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.वार्षिक अहवाल वाचन व लेखापरीक्षण वाचन व्यवस्थापक सौ.सविता पाटील मॅडम यांनी केले.त्यानंतर उत्कृष्ट गावविकास समिती
1. साई
2. उमरगा
3. लोदगा
4.पानचिंचलो
5.कव्हा
*उद्योजक महिलांचे सत्कार तसेच माविम मित्र ,CRP, CMRC स्टाफ याना भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले.शेवटी आभार सहयोगिनी सौ.एन.आर. कांबळे मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमासाठी माविम लातूर जिल्हा समनव्य अधिकारी सोमनाथ लामगुंडे सर, लेखाधिकारी स्वामी सर, कुरे सर ,अनंत हेरकर सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले तसेच व्यवस्थापक पाटील मॅडम लेखापाल,सहयोगीनी CRP कार्यकारणी सदस्य,माविम मित्र मंडळ यांनी भरपूर परिश्रम घेऊन कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडला.
0 Comments