https://www.amazon.in/bb/registration/start/?_encoding=UTF8&ref_=cct_cg_12345_1a1&pf_rd_p=9acff4bf-eee0-4854-9cca-99af421dadcf&pf_rd_r=HJNTZM43QKTMGKZ3FXDN

परळी नगर परिषद निवडणूक २०२५ : शफीक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम पक्ष सर्व १७ प्रभागांत उमेदवार देणार-मोहसीन शेख



 परळी नगर परिषद निवडणूक २०२५ : शफीक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम पक्ष सर्व १७ प्रभागांत उमेदवार देणार-मोहसीन शेख

परळी वैजनाथ / प्रतिनिधी

आगामी परळी नगर परिषद निवडणूक २०२५ मध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली एमआईएम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांच्या सूचने वरुण बीड़ जिला अध्यक्ष शफीक भाऊ यांचा मार्गदर्शन खाली शफीक भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण ताकदीने रणसज्ज होऊन उतरणार असल्याची माहिती एमआयएमचे परळी शहर अध्यक्ष मोहसीन शेख यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

तालुकाध्यक्ष मोहसीन शेख यांनी सांगितले की, परळी नगर परिषदेच्या सर्व १७ प्रभागांत तसेच नगराध्यक्ष पदासह एमआयएम आपले उमेदवार उभे करणार आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक न्याय या तत्त्वांवर पक्ष निवडणूक लढविणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, शहराच्या विकासासाठी एक सक्षम, पारदर्शक आणि सर्व समाजघटकांना न्याय देणारे नेतृत्व परळीकरांना देण्याचा आमचा संकल्प आहे. असदुद्दीन ओवैसी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली परळीमध्ये एमआयएमचा झेंडा फडकविण्याचा आमचा निर्धार आहे,” असे मोहसीन शेख यांनी सांगितले. 

पक्षाच्या निवडणूक तयारीसंदर्भात लवकरच उमेदवारांची निवड प्रक्रिया आणि प्रचार आराखडा जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


Post a Comment

0 Comments