मुरुड येथील दंतरोग चिकित्सक डॉक्टर बजरंग खडबडे यांचा शासकीय दंत महाविद्यालयात गौरव .. - latursaptrangnews

Breaking

Monday, June 30, 2025

मुरुड येथील दंतरोग चिकित्सक डॉक्टर बजरंग खडबडे यांचा शासकीय दंत महाविद्यालयात गौरव ..



मुरुड येथील दंतरोग चिकित्सक डॉक्टर बजरंग खडबडे यांचा शासकीय दंत महाविद्यालयात गौरव .. 
मुरुड प्रतिनिधी :- (श्रीकांत टिळक) लातूर तालुक्यातील मुरुड येथील दंतरोग चिकित्सक डॉ. बजरंग खडबडे यांचा छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दंत महाविद्यालयात गौरव करण्यात आला. रविवार दिनांक 29 जून रोजी शासकीय दंत महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या 44 व्या स्थापना दिनानिमित्त महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या मुरुड येथे सेवा देत असलेले दंतरोग चिकित्सक डॉ.बजरंग खडवडे यांचा महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माया इंदुरकर यांच्या हस्ते सर्टिफिकेट ऑफ ऍप्रिसिएशन देऊन गुणगौरव करण्यात आला. ग्रामीण भागात विविध दंत आरोग्य शिबिरे डॉ. खडबडे राबवत असतात. ज्यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय महाविद्यालयाचे 25 वर्षे पूर्ण झाले होते त्यावेळी 2004 च्या बॅचने सिल्वर जुबली ऑर्गनायझेशन या कार्यक्रमाचे व्यवस्थित आयोजन केले होते. त्याबद्दल एकोणचाळीस विद्यार्थ्यांचा सन्मान हे सर्टिफिकेट देऊन करण्यात आला.या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे तसेच सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment