https://www.amazon.in/bb/registration/start/?_encoding=UTF8&ref_=cct_cg_12345_1a1&pf_rd_p=9acff4bf-eee0-4854-9cca-99af421dadcf&pf_rd_r=HJNTZM43QKTMGKZ3FXDN

एटीएम मशीन कट करून पैसे चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक



 एटीएम मशीन कट करून पैसे चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. रोख रक्कम व वाहनासह 12 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत.


            याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसापूर्वी  पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये अज्ञात आरोपीच्या टोळीने ए.टी.एम. मशीन गॅस कटरने तोडून त्यामधील रोख रक्कम चोरल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे अज्ञात आरोपींच्या टोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


             सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी नमूद गुन्ह्यातील अज्ञात आरोपींच्या शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश देऊन पथके गठीत केले होते. त्या अनुषंगाने मंगेश चव्हाण अपर पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले. 

             सदर पथकाने मिळवलेल्या गोपनीय माहितीचे वरिष्ठांचे मार्गदर्शनात सखोल तांत्रिक  विश्लेषण करून मिळालेल्या माहितीवरून  एटीएम मशीन कट करून त्यामधील रोख रक्कम चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 03 वाजण्याच्या सुमारास लातूर ते औसा जाणाऱ्या रोडवरील एका खडी केंद्राजवळ चार संशयित आरोपींना वाहनासह  ताब्यात घेण्यात आले. त्यांची व त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यांच्याकडे गॅस टाकी, ऑक्सिजन सिलेंडर, गॅस कटर, तेलंगणा राज्याचे दोन  बनावट नंबर प्लेट, तसेच एक लाकडी मूठ असलेला खंजीर व रोख 01 लाख रुपये मिळून आले.अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 


1) आस मोहम्मद फजरूद्दीन, वय 40 वर्ष, राहणार नंगलीपठाण, तालुका किशनगडबास, जिल्हा अलवर,(राजस्थान)


2)मुस्तकीम आमीन, वय 26 वर्ष राहणार बीमा तालुका फिरोजपुर जिल्हा लोह (हरियाणा)


3) हमीद हबीबखान वय 25 वर्ष, राहणार परवाखेडा तालुका हुजूर, जिल्हा भोपाळ (मध्य प्रदेश)


4) लीखीमन  हूरी (गुज्जर) वय 27 वर्ष, राहणार बाजोट तालुका किशनगडबास, जिल्हा अलवर, (राजस्थान)

             असे असल्याचे सांगून ता. भरतपुर राजस्थान  येथे राहणारा त्यांच्या टोळीप्रमुखाच्या सांगण्यावरून  उदगीर येथील ए.टी.एम. गॅस मशीनने कट करून त्यामधील रोख रक्कम एक लाख रुपये चोरी केल्याचे कबूल केले.  सदरची  चोरी केलेली रोख रक्कम एक लाख रुपये , गॅस सिलेंडर, ऑक्सीजन सिलेंडर गॅस, कटर, खंजीर तसेच गुन्ह्यात वापरलेली कार क्रमांक एम.पी.04 वाय.जी. 4678 असा एकूण 12 लाख 24 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून नमूद आंतरराज्य टोळी कडून लातूर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील व इतर राज्यातील आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याप्रमाणे पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस अधिकारी व अमलदार पुढील तपास करीत आहेत. 

           सदरची कारवाई श्री.अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लातूर श्री. मंगेश चव्हाण अपर पोलीस अधीक्षक लातूर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे,  

  पोलीस अमलदार सर्जेराव जगताप, युवराज गिरी, रियाज सौदागर, राजेश कंचे, गोविंद भोसले, जमीर शेख, मोहन सुरवसे,  सिद्धेश्वर मदने, राहुल कांबळे,शैलेश सुडे, हरी पतंगे, महिला पोलिस अमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments