मुरुड परिसरात रोडरोमिओचा वावर...!
अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कंबर कसतील का ?
श्रीकांत टिळक
मुरुड प्रतिनिधी:- लातूर तालुक्यातील मुरुड शहर हे विद्याचे माहेरघर असे मानले जाते, मुरुड परिसरात दहावी,बारावी,आदी खासगी ट्युशनचे वर्ग चालवले जातात. याचाच फायदा घेत काही टवाळखोर रोडरोमिओ या मुलींचा पाठलाग करून छेड काढतात. भीतीपोटी कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नसल्याने पालकांना सांगितले तर शाळा बंद करतील .यामुळे त्यांच्यापुढे समस्या होत असून या रोडरोमिओंचा बंदोबस्त कोण करणार असा सवाल सर्वसामान्य विचारत आहेत. या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी पालक वर्ग करत आहेत.
तसेच यामध्ये ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी कल आहे. मुरुड येथील उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालय परिसरात महिला व विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून गस्त घालण्यात येईल का ? अशा विविध प्रकारच्या चर्चा नागरिकात होताना निदर्शनात येत आहेत. अनेक ठिकाणी शाळेच्या परिसराच्या जवळ पान टपऱ्या, हॉटेल, रेस्टॉरट, पान स्टॉल विनापरवाण्याच्या त्या थाटून रोडरोमिओ उभे राहिलेले असतात आणि सर्रास शाळा सुटली किंवा कॉलेज सुटले कीच रोडरोमिओ आपले रंग दाखवण्यासाठी पुढे अग्रेसर असतात, तसेच शाळा व विदयालय परिसरात रेंगाळणारे तसेच रोडरोमिओ पोलिसांच्या रडारवर येतील का ? मुरुड पोलीस ठाण्यात हद्दीत जिल्हा परिषद यासह खासगी ,अनुदानित व विना अनुदानित शाळा, कोचिंग क्लासेस मोठ्या संख्येने आहेत. तसेच ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा फुले अभ्यासिका, यूपीएससी एमपीएससी परीक्षा तयारीसाठी क्लासेस, अभ्यासिका , कॉलेज,विद्यालये देखील आहेत . त्यात विद्यार्थीनींची संख्या लक्षणीय आहे. शाळा,विद्यालय भरताना आणि सुटताना परिसरात मोठी गर्दी होते. यात काही मुले व तरुण रेंगाळतात. तसेच यामध्ये शिवाजी नगर, पारू नगर, बस स्टँडच्या मध्ये व बाहेर, ठोंबरे नगर, शंकर नगर, बसवेश्वर चौक सारख्या विद्यालय व ट्युशन परिसरामध्ये ही काही टवाळखोरांचाही वावर तेथे असतो. त्यांच्याकडून विद्यार्थीनी तसेच महिलांची छेड काढण्याचा प्रकार होतो.यातील काही मुली, विद्यार्थिनी असे प्रकरणे पोलिसांकडे जातात. त्यानंतर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते,साधारणता काही महिन्यापूर्वी पोलीस प्रशासनाकडून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे,मात्र असे प्रकार घडूच नयेत यासाठी पोलिसांनी कंबर कसली पाहिजे, यासंदर्भात जिल्हा परिषद, खासगी अनुदानित व विना अनुदानित, विद्यालयाने सर्व प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेचे ओळखपत्र देणे अनिवार्य करणे गरजेचे आहे ,जेणेकरून पोलिसांना त्या संदर्भात माहिती मिळेल व योग्य कारवाई करता येईल. तसेच समाज जागृती माध्यमिक विद्यालय, व उच्च माध्यमिक,जनता विद्या मंदिर, जिल्हा परिषद शाळा अशा परिसरात पोलिसांची गस्त घालण्यात यावी म्हणून अशी मागणी नागरिक करत आहेत.मुरुड परिसरामध्ये अशा प्रकारची अवस्था निर्माण होऊ नये, योग्य वेळेवर उपाय योजना करता येईल व अनुचित प्रकार टाळेल यासाठी पोलीस प्रशासन काय कारवाई करेल याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
0 Comments