मुरूड परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही

 



मुरूड परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही

लातूर/अहमदपूर: आज दिनांक 15.12.2025 रोजी रात्री 9.45 ते 10.05 मिनिटां सुमारास मौजे मुरूड, करकट्टा तालुका जिल्हा लातूर येथे मोठा आवाज होऊन भूकंप सदृश्य धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती.

सबब माहितीची जिल्हा प्रशासनाने त्वरित नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडे तपासणीसाठी पाठपुरावा केला.

तपासणीचा निष्कर्ष:

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) कडून करण्यात आलेल्या तपासणीनुसार, लातूर तालुक्याच्या भौगोलिक कार्यक्षेत्रात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नाही. 

जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये.

-जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर

Post a Comment

0 Comments