लातूरमध्ये इतिहास घडतोय – पती-पत्नी एकाच प्रभागातून निवडणूक रिंगणात



 **महाराष्ट्र विकास आघाडीचा दणका!

लातूरमध्ये इतिहास घडतोय – पती-पत्नी एकाच प्रभागातून निवडणूक रिंगणात

लातूर | प्रतिनिधी

लातूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रभाग क्रमांक २ मधून रेश्मा नौशाद शेख व पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते नौशाद उर्फ नाना शेख यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रथमच पती-पत्नी एकाच प्रभागातून निवडणूक लढवत असल्याने ही उमेदवारी संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

केसर जवळगा येथील शेख कुटुंबातून लातूरच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. स्व. इमामुद्दीन शेख गुरुजी यांचे चिरंजीव इकबाल शेख यांच्या कुटुंबातील सून रेश्मा शेख यांनी नगरसेवक सदस्यपदासाठी नामांकन दाखल करत राजकारणात दमदार प्रवेश केला आहे. नामांकनानंतर गाव व शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांनी फोन व प्रत्यक्ष भेटीतून शुभेच्छांचा वर्षाव केला.

नामांकन दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना रेश्मा शेख व नाना शेख यांनी ठाम भूमिका मांडत सांगितले,

“प्रभाग क्रमांक २ हा आमचा परिवार आहे. आम्ही येथे केवळ राजकारण नाही, तर विकासाचा संसार उभारणार आहोत. पारदर्शक, निर्भीड आणि जनतेच्या हिताचा कारभार हेच आमचे ध्येय आहे.”

या वेळी त्यांनी विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडला—

रस्ते, पाणीपुरवठा व ड्रेनेज व्यवस्था

आरोग्य व शिक्षण सुविधा

महिलांचे प्रश्न व युवकांना संधी

प्रभागाचा सर्वांगीण व न्याय्य विकास

“सत्तेसाठी नव्हे, तर सेवेसाठी उमेदवारी” असा ठाम संदेश देत त्यांनी मतदारांचे लक्ष वेधले.

नॉमिनेशनच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक, मतदार व समर्थक उपस्थित होते. प्रभाग २ मध्ये उत्साहाचे वातावरण असून, “हे फक्त उमेदवार नाहीत, तर आमच्यातलेच लोक आहेत” अशी भावना मतदारांकडून व्यक्त होत आहे.

प्रभाग क्रमांक २ मधील निवडणूक आता केवळ लढत न राहता एक जनआंदोलन बनत चालली आहे.

लातूरच्या राजकारणात बदलाची नांदी ठरणारी ही उमेदवारी नेमका कोणता इतिहास घडवते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments