Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    इंग्लिश माध्यमांच्या शाळांकून पालकांची मोठी आर्थिक लूट





     इंग्लिश माध्यमांच्या शाळांकून पालकांची मोठी आर्थिक लूट


    *इंग्लिश माध्यमाला शासनाने दिलेल्या नियमानुसार फिस घेण्याचे आदेश असतानाही भरमसाठ मनमानी फिस आकारण्यात येत आहे अशा संस्थेवर कारवाई करावी मोफत शिक्षणाचा अधिकार असताना अशा संस्थेच्या माध्यमातून पालकांची लुट.*.,...

     


    सध्या सगळीकडे उन्हाळ्याची सुट्टी संपवून शाळा सुरू झाल्या आहेत. पण पालकांचा जास्त ओढा सरकारी शाळापेक्षा इंग्लिश शाळाकडे असल्याचे दिसून येत आहे. पण याच गोष्टीचा फायदा घेऊन इंग्लिश माध्यमाच्या शाळा पालकांची मोठी आर्थिक लुट करत असल्याचे अनेक प्रकरणे समोर आले आहेत.

    सरकारी शाळामध्ये सरकारकडून सर्व सुख सुविधा पुरविल्या जात असतांनाही पालक वर्ग शिक्षणाच्या दर्जा सरकारी शाळेत खालावलेला आहे असे कारण पुढे करून सरकारी शाळेकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सरकारी मराठी शाळा यांचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील बर्‍याच मराठी सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी शाळामध्ये विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या,पोषण आहार हा मोफत पुरविण्याची व्यवस्था केली जात आहे. त्याच बरोबर सरकारी शाळेत विविध शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा, विविध गुणदर्शन कार्यक्रम मोफत राबविले जातात. पण आत्ताच्या लाईफ लाईनच्या जीवनात फक्त आपली मुले इंग्लिश माध्यमातील शाळेत शिकली पाहिजेत या अपेक्षेपोटी पालक पोटाला चिमटा घेऊन स्वत:च्या पाल्याला इंग्लिश माध्यमात शिकवण्याचा निर्णय घेत आहेत.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad