लातूर जिल्हा बँकेच्या ATM विभागात एक कोटीचा घोटाळा
लातूर जिल्हा बँकेच्या ATM विभागात एक कोटीचा घोटाळा
लातूर : आर्थिक शिस्त व पारदर्शकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध सात शाखांमधील 'एटीएम' व्यवहारात एक कोटी चार लाख एकोणपन्नास हजार सहाशे रूपयांचा आर्थिक घोटाळा झाला असून या प्रकरणी बँकेच्या उपसरव्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून अज्ञाताच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चे आर्थिक शिस्तीच्या बाबतीत लातूर जिल्ह्याचे नाव राज्यभरात आहे. जिल्हा बँकेने एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे 'एटीएम' सुविधा चालू केली. पण जानेवारी २०२२ ते जून २०२३ दरम्यान लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अहमदपूर, चाकूर, एमआयडीसी दत्तनगर, उदगीर आदीसह सात शाखेतील एटीएम मशीनशी छेडछाड करून या मशीन विविध बँकेचे एटीएम कार्डचा वापर करून एक कोटी चार लाख एकोणपन्नास हजार सहाशे रूपयांची फसवणूक केली आहे.
फसवणूक झाल्याचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सुमारे अठरा महिन्याच्या कालावधीत हि फसवणूक झाली आहे. अशी फसवणूक कोणी केली. यात ईतर जबाबदार अधिकारी-कर्मचारी सहभागी आहेत का? एवढ्या प्रदिर्घ काळात एवढा मोठा घोटाळा शिस्तीच्या बँकेस लक्षात कसा आला नाही असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या घोटाळा प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल आहे. या अज्ञातात कोण आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.
No comments