Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    मुरुड येथे एमआयडीसी स्थापन करा, भिम क्रांती संघाची मागणी खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश आप्पा कराड यांना निवेदन




     मुरुड येथे एमआयडीसी स्थापन करा, भिम क्रांती संघाची मागणी

      खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश आप्पा कराड यांना निवेदन

    मुरुड प्रतिनिधी : - मुरुडचा वाढता विस्तार पाहता येथे एमआयडीसीची आवश्यकता असून येथे मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे नव उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी एमआयडीसीची गरज असून यासंदर्भात भीम क्रांती संघाचे संस्थापक अध्यक्ष जयदीप सुरवसे यांनी लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे आणि आमदार रमेश आप्पा कराड यांना निवेदन देऊन मागणी केली आहे तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत विविध विकास कामासंबंधी ही यावेळी निवेदन देण्यात आली आहे.

    दिलेल्या निवेदनात विस्तृत असे म्हटले आहे की,मुरुड हे गाव लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठे असून या गावची लोकसंख्या ५०००० च्या घरात असून मजुरी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच येथील बाजारपेठ मोठी असून बरेच उद्योग कार्यरत आहेत मुरुडच्या आसपासची ५० गावे व्यापाराशी संलग्न असून  नवयुवकांचा भरणा जास्त प्रमाणामध्ये आहे, त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे बेरोजगारांचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे.ज्या नव युवकांना  उद्योग सुरू करायचा आहे, अशांना जागेचा पाण्याचा, विजेचा प्रश्न भेडसावत आहे. 

    जर मुरुड येथे एमआयडीसीची स्थापना झाली तर वरील सर्व प्रश्न सुटतील मुरूडच्या आणि आसपासच्या गावातील नव उद्योजक निर्माण होतील व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल आणि मुरुडच्या उत्पन्नात भर पडून विकास होईल. यासाठी शासन स्तरावर एमआयडीसीसाठी प्रयत्न करण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

    मुरुड मध्ये दलित वस्ती मोठ्या प्रमाणात असून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत दत्तनगर येथील संभाजी चौक ते क्रीडा संकुल रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्यात यावे तसेच रमाई आंबेडकर नगर येथील नालंदा बुद्ध विहार आण्णा भाऊ साठे चौक दरम्यानचा सिमेंट काँक्रीट रस्ता करणे व भीम नगर ते चव्हाणवाडी समशान भूमी यादरम्यान असलेला रस्ता करणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात अर्धवट राहिलेली संरक्षण भिंत बांधून पेव्हर ब्लॉक बसविणे, नालंदा बुद्ध विहाराची इमारत जीर्ण झाली असून ते पाडून नवीन इमारत बांधणे, दत्तनगर येथील वैशाली समाज मंदिराची इमारत जीर्ण झाली असून तेथे वैशाली बुद्ध विहार बांधणे व  दत्तनगर येथे सांची स्तूपाची कमान उभा करणे, तसेच मुरुड येथील भीम नगर व दत्तनगर येथील सार्वजनिक समशानभूमीची नोंद सातबारा वर नसून याची नोंद घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना आदेशित करावे असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

    याभेटी दरम्यान खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश आप्पा कराड यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून मुरुड येथे एमआयडीसी संदर्भांमध्ये प्रयत्न केले जातील असे आलेल्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad