Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुरुड मध्ये वृक्षारोपण.





     छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुरुड मध्ये वृक्षारोपण.

     मुरुड प्रतिनिधी : - येथील दत्तनगर परिसरातील क्रीडा संकुल ते पाण्याचा हातपंप पर्यंत या ठिकाणी भिम क्रांती संघाच्यावतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात करण्यात आले.

     या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मध्ये मुरुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप दादा नाडे, उपसरपंच हनुमंत नागटिळक. ग्रामपंचायत सदस्य तथा संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष वैभव सापसोड, ग्रामपंचायत सदस्य लताबाई भोसले, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गाडे, प्रवीण पाटील सर तसेच रवींद्र बापू नाडे, तहसीलचे संपादक बाळासाहेब जाधव, अभियंता चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

    सर्वप्रथम मान्यवरांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या परिसरात  वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षारोपणात नांदुर्गी, गुलमोहर, नीलमोर, पिंपळ, करंजी, पिंपरी, रिइंट्री आदी झाडी लावण्यात आली. तसेच हा परिसर ग्रामपंचायतच्यावतीने स्वच्छ करण्यात आला होता.

     हा वृक्षारोपणाच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिम क्रांती संघाचे संस्थापक अध्यक्ष जयदीप सुरवसे, संतोष ठोके, विनोद साबळे, अनिल गायकवाड, संजय ठोके, विजयदीप सुरवसे, लालासाहेब आल्टे, पत्रकार श्रीकांत टिळक,मोहित जगताप, अक्षय झेंडे, मुकेश बागडे, रवी उबाळे, आदीने परिश्रम घेतले होते.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad