आषाढी एकादशी निमित्त मुरुड येथे वारकरी वेशभूषेत चिमुकल्यांची दिंडी
आषाढी एकादशी निमित्त मुरुड येथे वारकरी वेशभूषेत चिमुकल्यांची दिंडी
मुरुड प्रतिनिधी(श्रीकांत टिळक) :- स्थानिक सह्याद्री पोद्दार स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी वारकर्यांची वेशभूषा करून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढली यावेळी ज्ञानोबा माऊली -तुकारामाच्या गजराने संपूर्ण मुरुड परिसर दुमदुमून गेला होता, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी नृत्य,रिंगण, फुगडी इत्यादीची सादरीकरण करून महाराष्ट्राच्या संत परंपरांचे दर्शन यावेळी घडविले.
तसेच आषाढी एकादशी निमित्त सह्याद्री पोद्दार लर्न स्कूल मुरुड या शाळेमधील 600 विद्यार्थ्यांना फळ (केळी) महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्र, संचालक अविनाश गुंडूराव सवाई तसेच वार्ड क्रमांक 5 च्या ग्रामपंचायत सदस्या सौ. श्रुती अविनाश सवाई यांच्यातर्फे वाटप करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब जाधव,चैताली वाघमारे,विशाल कणसे, यांनी फळे वाटप केली हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अभिजित दंडे यांनी परिश्रम घेतले.
त्याप्रसंगी पोद्दार लर्न स्कूल चे अध्यक्ष - श्री.आदित्य पाटील सर,
श्रुती पाटील, प्रिंन्सिपल विराज माकनिकर ,जंबो किड्स pgk चे मॅडम सौ.शीतल महाजन, स्पोर्ट चे तुकाराम घाडगे सर तसेच सर्व विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले
No comments