व्यवसाय परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची लातूर व्यापारी महासंघाची मनपा आयुक्तांकडे मागणी - latursaptrangnews

Breaking

Saturday, June 28, 2025

व्यवसाय परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची लातूर व्यापारी महासंघाची मनपा आयुक्तांकडे मागणी

 


व्यवसाय परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची लातूर व्यापारी महासंघाची मनपा आयुक्तांकडे मागणीव्य

वसाय परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची

लातूर व्यापारी महासंघाची मनपा आयुक्तांकडे मागणी
लातूर :  लातूर शहरातील व्यवसाय परवाना ( ट्रेड लायसन्स ) कायमस्वरुप रद्द करण्याची मागणी लातूर व्यापारी महासंघाच्या वतीने एका निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
लातूर व्यापारी महासंघाच्या वतीने लातूर शहर महानगर पालिकेच्या नूतन आयुक्त सौ. मानसी मीना यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, लातूर शहरातील सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधीत्व करण्याचे काम लातूर व्यापारी महासंघाकडून केले जाते. लातुरातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या नूकत्याच पार पडलेल्या बैठकीत व्यवसाय परवानासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत सर्व व्यापारी संघटनांनी मनपाने व्यवसाय परवाना कायमस्वरुपी रद्द करावा, अशी आग्रही मागणी लावून धरली. केंद्र व राज्य शासनाने जीएसटी कायदा संमत करताना जीएसटी कराव्यतिरिक्त व्यापाऱ्यांना इतर कोणतेही कर लागू करण्यात येणार नाहीत, असे आश्वासन दिले होते. सध्या व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे. विशेषतः ऑनलाईन ट्रेडिंग व मोठ्य प्रमाणावर मॉल संस्कृतीमुळे लहान, मध्यम व्यापारी, व्यावसायिक अडचणीत सापडला आहे. 
त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने लागू करण्यात आलेला व्यवसाय परवाना कायमस्वरुपी रद्द करावा व लातूर शहरातील व्यापार - उद्योग वृध्दीसाठी सहकार्य करण्याची विनंती मनपा आयुक्त सौ. मानसी मीना यांना प्रत्यक्ष भेटून करण्यात आल्याची माहिती लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रामदास भोसले, सचिव विशाल अग्रवाल,  कोषाध्यक्ष राघवेंद्र ईटकर यांसह महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. महासंघाच्या या मागणीसंदर्भात व्यापारी संघटनांसोबत चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिल्याचे रामदास ( तात्या ) भोसले यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रदीप सोलंकी, विजयकुमार चितकोटे, विनोद गिल्डा, दत्तात्रय पत्रावळे, नागेश स्वामी, अतुल कोटलवार, अरुण सोमाणी, अंकुश भोसले, निसार विंधानी, फारुख शेख, मुस्तफा शेख, राजेश फडकुले, महेश तोंडारे, श्रीराम डागा, अमित ईटकर, पुरुषोत्तम कालिया, विनायक चन्नागिरे, अजय तापडिया, प्रमोद तिवारी, सोनी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment