https://www.amazon.in/bb/registration/start/?_encoding=UTF8&ref_=cct_cg_12345_1a1&pf_rd_p=9acff4bf-eee0-4854-9cca-99af421dadcf&pf_rd_r=HJNTZM43QKTMGKZ3FXDN

माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांच्या बांधावर जाऊन घेतली भेट;




 माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी हाडोळती येथील

शेतकरी अंबादास पवार यांच्या बांधावर जाऊन घेतली भेट;
शेतकऱ्यांचा आवाज बनून त्यांचे शासनाकडून प्रश्न सोडवण्याचे दिले आश्वासन

 लातूर (प्रतिनिधी) रवीवार ६ जुलै २५ :
बैलजोडी नाही म्हणून स्वतःला औताला जुंपून घेऊन महाराष्ट्रातील
शेतकऱ्यांची विदारक स्थिती जगासमोर आणणारे अहमदपूर तालुक्यातील हाडोळती
येथील शेतकरी अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नीची राज्याचे माजी वैद्यकीय
शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
रविवारी (दि. ०६ जुलै २५) दुपारी त्यांच्या शेतात जाऊन भेट घेतली आणि
त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी अंबादास पवार यांच्याकडून
सद्यस्थितीतील शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतल्यानंतर, सर्व प्रश्न
सोडवण्यासाठी आपण शेतकऱ्यांचा आवाज बनून विधानसभेत काम करू आणि शासनाकडून
हे सर्व प्रश्न सोडवून घेऊ, असे आश्वासन त्यांना दिले.
बहुतांश शेतकरी आता अल्पभूधारक झाल्यामुळे त्यांना बैलजोडी ठेवणे शक्य
होत नाही, शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे यांत्रिकीकरणामार्फत शेतीची
कामे करणेही अशक्य आहे. डिजिटल साक्षरता नसल्यामुळे शासनाच्या योजनांचे
शेतकऱ्यांना फॉर्म भरता येत नाहीत, तर अनेकांनी शेतकरी ओळखपत्रही अद्याप
काढलेले नाही. परिणामी या योजनांचे फायदे सामान्य शेतकऱ्यांना मिळत
नाहीत, अशा समस्या त्यांनी निदर्शनास आणल्या. शेतकऱ्यांच्या या अडचणी
शासनाने अगोदर सोडवायला हव्यात, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला हवे, आणि
विमा व इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन सोबत ऑफलाइन फॉर्म भरण्याची
व्यवस्था व्हायला हवी, अशा मागण्या श्री. पवार यांनी माजी मंत्री आमदार
अमित देशमुख यांच्या सोबत झालेल्या चर्चेत केल्या.
शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री. अंबादास पवार यांनी ज्या समस्या
मांडल्या आहेत आणि ज्या मागण्या केल्या आहेत, त्या विधानसभेत मांडून त्या
सोडवून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन या
भेटीदरम्यान आमदार अमित देशमुख यांनी श्री. पवार व परिसरातील शेतकऱ्यांना
दिले.
यावेळी माजी आमदार तथा विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन
वैजनाथ शिंदे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लातूर
जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय
साळुंखे, ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, चंद्रकांत मद्दे,
संजय पवार, अनिल चव्हाण, शिवानंद भोसले, शिवानंद हेगणे, निलेश देशमुख,
गिरीश देशमुख, माधव पवार, प्रवीण सूर्यवंशी, अरबाज पठाण, पुंडलिक वंगवाड
आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित
होते.

Post a Comment

0 Comments