शहीद टिपू सुलतान सार्वजनिक जयंती 2025 – वृक्षारोपण कार्यक्रम
आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025, गुरुवार रोजी एच. पी. शैक्षणिक संकुलात शहीद टिपू सुलतान सार्वजनिक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद माननीय इसरार जी सगरे साहेब यांनी भूषविले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये एच. पी. शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष माननीय अझहर सर, माननीय मजहर सर, तसेच लातूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर पाहुण्यांचा सहभाग होता. यामध्ये शिवाजी पाटील साहेब, पप्पू धोत्रे साहेब, कमलाकर सूर्यवंशी साहेब, बशीर शेख साहेब (टिपू), शेख सत्तार भाई, वहिद सर, रामदास काळे साहेब, गोविंद केंद्रे साहेब, प्रदीप गणेश साहेब, वाजिद भाई, मणियार साहेब, अॅड. सौदागर मुश्ताक, इरफान भाई, अनिल गायकवाड साहेब, डॉक्टर ताहेर शेख ,अलंद सलीम साहेब, जुनेद आतार, सय्यद सलीम सर, युसूफ शेख साहेब, तसेच अॅड. सुनील कांबळे साहेब यांचा समावेश होता.
या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उत्साहाने वृक्षारोपणात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जयंती निमित्त सर्वांनी शहीद टिपू सुलतान यांच्या शौर्य,पराक्रम आणि राष्ट्रप्रेमाचा आदर्श स्मरला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख इमरान सर यांनी केले.कार्यक्रमास यशस्वी रित्या पार पाडण्यास फुरखान सर , जफर सर आणि अहमद सर,खान सर यांनी परिश्रम घेतले.
0 Comments