देशमुख-निलंगेकर वाद पुन्हा चर्चेत?



 निलंगा : देशमुख-निलंगेकर वाद पुन्हा चर्चेत?

काँग्रेसचे स्टार प्रचारक माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी निलंगा नगर परिषद निवडणुकीसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर अनुपस्थित राहिले. यावर देशमुख यांनी “ते इतर कामात व्यस्त असतील” असे उत्तर दिल्याने दोघांमधील अंतर्गत मतभेदांची चर्चा पुन्हा रंगू लागली.

या निवडणुकीत निलंगेकर गटाला उमेदवारीत दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून होत असून नगराध्यक्ष पदासाठी त्यांचे दोन अर्ज कायम आहेत. देशमुख यांनी नगरपालिकेतील मागील कारभारात भष्टाचार झाल्याचा आरोप करून काँग्रेसला सत्ता मिळाल्यास चौकशी करण्याचे आश्वासन दिले. ही निवडणूक सामान्य निलंगेकरांची असून ‘देशमुख विरुद्ध निलंगेकर’ अशी उभी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

या परिषदेला खा. डॉ. शिवाजी काळगे व जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आदी उपस्थित होते. अनुपस्थितीबाबत विचारले असता निलंगेकर यांनी “मी सोलापूर जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी आलो आहे” असे सांगितले.

Post a Comment

0 Comments