हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापेमारी



 हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापेमारी 04 गुन्हे दाखल– 96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त.स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


            लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत दिनांक 23/11/2025 रोजी पोलीस ठाणे रेणापूर हद्दीतील विविध ठिकाणी लपून-छपून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या व्यक्तींवर धडक कारवाई करण्यात आली.


           कारवाईदरम्यान हातभट्टी दारू तयार करणाऱ्या 4 व्यक्तींविरुद्ध 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, तयार दारू, हातभट्टी साहित्य व रसायन असा मिळून 96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच घटनास्थळी आढळलेली हातभट्टी भट्टी, दारू आणि रसायनांचा जागेवरच नाश करण्यात आला.


         ही कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पथकातील पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे आणि प्रवीण कोळसुरे यांनी केली.

             लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांकडून सातत्यपूर्ण आणि प्रभावी कारवाई सुरू आहे.अवैध हातभट्टीविरोधातील ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र गतीने चालू राहणार आहे.

Post a Comment

0 Comments