शहीद टिपू सुल्तान जयंती निमित्त झहीर भाई साकोळकर तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनपा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी जहीर भाई साकोळकर यांच्या वतीने महानगरपालिका शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक असलेली वह्या, पेन, पेन्सिल, रबर, रंगसाहित्य तसेच इतर शिक्षणोपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले.
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. प्राध्यापक जवळगेकर यांनी सांगितले की, “शिक्षण हेच भविष्यातील मजबूत पाया असून प्रत्येक विद्यार्थ्याला सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.”
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच प्रभागातील माजी नगरसेवक धोंडीराम यादव, साळुंके साहेब व समाज सेवक जफर भाई शेख यांची उपस्थिती होती. सर्वांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. प्रास्ताविक शाहीद दुरुगे सर यांनी केली व शाळेतील शिक्षिका जाधव मॅडम यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ..अफराज पठाण शादाब शेख तोफिक सय्यद इरफान शेख वसीम शेख इस्राईल शेख रेहान शेख नासिर शेख आसिफ शेख अकबर पठाण ... यांनी सहकार्य केले .
0 Comments