रेणा सहकारी साखर कारखान्याकडून उस उत्पादकांना दिलासा प्रति मे.टन ₹2750 प्रमाणे उसबिलाची थेट खात्यात जमा



रेणा सहकारी साखर कारखान्याकडून उस उत्पादकांना दिलासा
प्रति मे.टन ₹2750 प्रमाणे उसबिलाची थेट खात्यात जमा

दिलीपनगर निवाडा/ रेणापूर, दि. 04 डिसेंबर

रेणा सहकारी साखर कारखाना, दिलीपनगर (ता. रेणापूर, जि. लातूर) यांनी चालू गळीत हंगाम 2025-26 मध्ये गाळपास आलेल्या उस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कारखान्याने 03 डिसेंबर 2025 पर्यंत एकूण 67,640 मे.टन उसाचे गाळप पूर्ण केले असून, यासंबंधीचे उसबील प्रति मेट्रिक टन ₹2750/- प्रमाणे दि. 04 डिसेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

मांजरा परिवाराचे मार्गदर्शक, राज्याचे माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक मा. दिलीपराव देशमुख, माजी मंत्री तथा आमदार मा. अमितदेशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व संचालक मा.आ. धीरजभैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.

दि. 18/11/2025 ते 30/11/2025 या कालावधीत कारखान्यास गाळपास आलेल्या ऊसासाठी एफ.आर.पी. दरानुसार प्रतिमेट्रिक टन ₹2750/- प्रमाणे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया आज पूर्ण केली जाणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यातून रक्कम उचलण्याचे आवाहन कारखान्याकडून करण्यात आले आहे.

यासोबतच, अधिकाधिक ऊस उत्पादकांनी आपला ऊस रेणा कारखान्यास गाळपास पाठवावा, असे आवाहन चेअरमन अनंतराव ठाकूरदेशमुख, व्हाइस चेअरमन अ‍ॅड. प्रवीण पाटील, सन्माननीय संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments