लातूर :- हरंगुळ (बु.) ग्रामपंचायत हद्दीतील समर्थ नगर (रेल्वे स्टेशन) परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ चालू असलेल्या देशी दारू दुकान क्र. २२५ बाबत ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप नोंदवले असून, संबंधित दुकानाचे तात्काळ स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण ग्रामसभेत दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत सौ. पंचशील धम्मानंद कांबळे (ग्रापं सदस्य) यांनी या दुकानाविरोधात अधिकृत तक्रार मांडली. सदरील तक्रारीसह सर्व संदर्भ नोंदींचा अभ्यास करण्यात आला असता, दुकान नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाल्याने ठराव क्र. ०९ अन्वये स्थलांतराची शिफारस एकमताने करण्यात आली.
तसेच शाळेपासून फक्त ६० मीटर अंतरावर दुकान सध्याच्या नियमानुसार देशी दारू दुकान शैक्षणिक/धार्मिक संस्थेपासून किमान ५० मीटर अंतरावर असावे.
ग्रामपंचायत हद्दीत: किमान १०० मीटर अंतराचे बंधन आहे. मात्र हेे देशी दारू दुकान हे हरंगुळ (बु.) ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून फक्त ६० मीटर अंतरावर असल्याचा मोजणी पंचनाम्यात उल्लेख आहे. त्यामुळे दुकान नियमांचे स्पष्ट उल्लंघन करत असल्याचे ग्रामपंचायतीने नोंदविले आहे.
मा. मुख्याध्यापक, जि.प.प्रा. शाळा समर्थ नगर यांनी दिलेल्या अहवालानुसारशाळेची स्थापना: इ.स. १९९७ पासून चालू वर्ग : इयत्ता १ ली ते ५ वी तर दुकानाचे संचालन इ.स. २०१४ पासून सुरू झालेले आहे. यामुळे शाळा अस्तित्वात आल्यानंतरच दुकान सुरू झाल्याचे स्पष्ट होते.
विद्यार्थी व महिलांना त्रास ग्रामस्थांची तक्रार
शाळेजवळून मद्यधुंद अवस्थेत जाणारे ग्राहक महिला शिक्षक व विद्यार्थ्यांना शिवीगाळ, भांडणे व गैरवर्तन करतात, असा आरोप ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केला आहे. परिसरात असुरक्षित वातावरण निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामसभेच्या ठरावात स्पष्ट नमूद केले आहे की,
शाळेतील विद्यार्थी,महिला शिक्षक,आसपासचे रहिवासी या सर्वांना गंभीर त्रास होत असल्याने दुकान तत्काळ हलविणे आवश्यक आहे. स्थलांतरासाठी कडक कार्यवाहीची मागणी
ग्रामपंचायतीने अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, लातूर यांना अहवाल, पंचनामे, शाळेचा स्थापना अहवाल, ग्रामसभेचा ठराव सादर करून संबंधित नियमबाह्य दुकानाचे त्वरित स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. सदरील दिलेल्या निवेदनावर सरपंच शितल भीमाशंकर झुंजारे, ग्रामपंचायत अधिकारी व्ही व्ही पाटील , ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक यांच्या स्वाक्षर्या आहेत.
0 Comments