Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    दिवसभरातील ताज्या घडामोडी



    दिवसभरातील ताज्या घडामोडी


     ⚡ श्रद्धा वालकरच्या वडिलांचा वसई पोलिसांवर आरोप :


    दोन वर्षांपूर्वीच श्रद्धा वालकरने आफताब पुनावालाविरोधात वसई पोलिसांकडे तक्रार केली होती. तेव्हाच तक्रारीची दखल घेतली असती तर आज माझी मुलगी जिवंत असती. मात्र, वसई पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही, असा आरोप आज पत्रकार परिषदेत श्रद्धा वालकरचे वडिल विकास वालकर यांनी केला.


    💁‍♂️ आता शिक्षकांचीच परीक्षा होणार :


    आत्तापर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना देखील परीक्षा द्यावी लागणार आहे. कारण मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. शिक्षणाचा दर्जा ढासळल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रेकर म्हणाले आहेत. प्रशासनाकडून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण करण्यात आला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रकर म्हणाले.


    😎 राज्यपालांनी माफी मागितली नाही याची खंत... : 


    भाजपा खासदार आणि छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आज  पंतप्रधान मोदी आणि राज्यसभा खासदारांची बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, "राज्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने शिवरायांचा अवमान झाला, त्याबद्दल राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. ते पत्र प्रक्रियेनुसार गृहमंत्रालयाकडे गेलं आहे. आता आज पंतप्रधान मोदींना पत्र दिलं आहे. कोणताही विषय जास्त वाढू नये, राज्यामध्ये तेढ निर्माण होऊ नये. यासाठी लवकरात लवकर तोडगा निघणं गरजेचं आहे."


    🗣️ आता शिंदे-बोम्मई आमनेसामने चर्चा करणार :


    महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मध्यस्थी करणार आहेत. महाविकास आघाडीच्या खासदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची अमित शाहांकडे तक्रार केली. याची गंभीर दखल शाहांनी घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. १४ डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बोम्मई यांच्यासोबत अमित शाह एकत्र चर्चा करणार असल्याचं कोल्हेंनी सांगितलं.


    💥 लग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, 4 जणांचा मृत्यू :


    राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जोधपूरमध्ये आग लागून मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. लग्न सोहळ्यात वरात निघण्याआधीच गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 60 पेक्षा जास्त लोक गंभीररित्या भाजले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जोधपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad