💥 हवाई दलाची एकाच दिवशी तीन विमाने कोसळली :
भारतीय हवाई दलासाठी शनिवार अक्षरश: घातवार ठरला. राजस्थानच्या भरतपूरमध्ये एक चार्टर्ड विमान कोसळले. दुसरीकडे मध्य प्रदेशात सुखोई-30 आणि मिराज-2000 विमान कोसळले. मध्य प्रदेशातील अपघातात दोन पायलट सुरक्षित आहेत, तर एक गंभीर जखमी आहे. राजस्थानमधील विमान अपघातातानंतर पायलट बाहेर पडला असला, तरी त्याची अधिक माहिती मिळालेली नाही.
🏠 ओबीसींसाठी घरांची नवी योजना आणणार :
राज्य सरकार ओबीसींसाठी घरांची नवी योजना आणण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारकडून या योजनेची तयारी सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ओबीसींना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. लवकरच या संदर्भात प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
🗣️ पहाटेच्या शपथविधीवर अखेर शरद पवार यांचे भाष्य :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटे झालेल्या शपथविधीमागे पवार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर आता स्वतः शरद पवारांनी भाष्य केले आहे. पहाटेच्या शपथविधीला आता 2 वर्षे लोटलेत. त्यामुळे तो प्रश्न आता कशाला काढायचा?, असे ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
📝 अनिल देशमुखांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र :
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी कापसाच्या दरासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहलं आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांचा दर देण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे. सद्यस्थितीत शासनाने प्रति क्विंटल 6 हजार 380 असा दर निश्चित केला आहे. हा दर खूप कमी असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.
🎬 बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चा डंका :
बॉलिवूडचा किंग शाहरुख हा बॉक्स ऑफिसचादेखील बादशाह ठरला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. पठाणने रिलीजच्या दोन दिवसांत छप्पडफाड कमाई केली. आता चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचेदेखील आकडे समोर आले आहेत. खरं तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने भारतात दोन दिवसांच्या तुलनेत कमी कमाई केली, पण वर्ल्डवाइड चित्रपटाची दमदार कमाई झाली आहे.