मुरुड निवळी रस्त्याचे खड्डे बुजवणे या कामाची चौकशीची मागणी..
लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणाचा इशारा..!
मुरुड प्रतिनिधी ( श्रीकांत टिळक) :- बांधकाम विभागा अंतर्गत मुरुड निवळी शिवरस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम नुकतेच पार पडले असल्याचे निदर्शनात येत आहे. प्रत्यक्षात डांबरी रस्ता अत्सित्वात नसताना डांबराने खड्डे बुजवण्याचे काम मुरुड निवळी रस्त्यावर करून शासनाच्या पैशाची उधळपट्टी करून नागरीकांची फसवणुक व शासनाची फसवणुक करण्याचे काम विभागाकडून होत आहे.या बाबत नागरीकांनी व गावातील प्रतिष्टित राजकीय व्यक्तींनी संबंधित अधिकारी यांना ही बाब कळवून देखील सदरील काम थांबवले नसून ते घाईघाईने निष्कृष्ट दर्जाचे
करून घेतले आहे.कामाच्या नियमानुसार टेंडर झाले का ? असल्यास त्या बाबतची संपूर्ण माहिती (जाहीरात, एकुण निवीदा, अंतिम निवीदा, गुणवत्ता पत्रक इ.) दि. १५/०१/२०२५ पर्यंत आम्हाला दयावी. अन्यथा 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे.
बांधकाम विभागाने मुरुड निवळी रोडवरील बुजविले खड्डे परंतु कामाची चौकशी करा मुरुड च्या नागरिकांची मागणी अधिकारी व गुत्तेदर मॅनेज असल्याचा संशय असल्याकारणाने त्याची चौकशी व्हावी रवी अंधारे दत्ता गोरे यांची कार्यकारी अभियंता कडे मागणी.
मुरुड येथील बांधकाम भवन लातूर या विभागा अंतर्गत मुरुड येथील मुरुड निवळी रस्त्याच्या खड्डे बुजवण्याचे कॉन्ट्रॅक्ट काढून रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले होते.
परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे असून हे काम इस्टिमेट अथवा वर्क ऑर्डर प्रमाणे झाली नसल्याचे मुरुड निवळी रस्त्या जवळ राहणाऱ्या नागरिकांचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने मुरुड येथील सुजाण नागरिकांनी या संदर्भा मध्ये मुरुड नवे रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे काम आडवून बांधकाम भवन येथील संबंधित इंजिनिअर व गुत्तेदार यांना विचारले असता यांनी टोलवा टोलवी चे उत्तरे देण्याचे काम केले. असे दत्ता गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तसेच मुरुड मधील प्रतिष्ठित नागरिकांनी व ग्रामपंचायतचे सदस्य यांनी सुद्धा कामाचे पाहणे करून इंजिनीयर व गुत्तेदारास बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे म्हटले जात आहे.
त्यामुळे हे काम 20 लाख रुपयांचे असून तेवढ्या रकमेच्या बदल्यात हे काम झालेले नाही असे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. तसेच मुरुडकर यांचे म्हणणे आहे की बांधकाम भवन मधील कार्यकारी अभियंता असतील बांधकामाचे इंजिनिअर असतील तसेच कर्मचारी असतील याकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहे .त्यामुळे मुरुड मधील नागरिकांना संशय आहे ? की या मुरुड निवडी रस्ता खडे बुजवण्या मागे बांधकाम भवनचे बडे अधिकारी तसेच कॉन्ट्रॅक्टदार या दोघांची मिली भगत तर नाही ना ? असा संशय मुरुडच्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे .या कामाच्या रकमेची वसुली करण्यासाठीचे काम केल्याचे दिखावा तर नाही ना? असे मुरुड येथील नागरिकांमध्ये बोलले जात आहे परंतु या गोष्टीकडे गांभीर्याने घेऊन मुरुडचे सामाजिक कार्यकर्ते रवी अंधारे व दत्ता गोरे यांनी खड्डे बुजवण्याच्या कामाची चौकशी करून पीडब्ल्यूडी चे कार्यकारी अभियंता निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
मुरुड निवळी रोडचे खड्डे संदर्भा मध्ये अधिकारी व गुत्तेदार यांच्यात ताळमेळ नसल्याचे निष्पन्न झाल्याची चर्चा आहे म्हणून येथील 26 जानेवारी रोजी या झालेल्या कामाची चौकशी करून जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यांचे बिल काढण्यात येऊ नये अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी उपोषणास ला बसण्याचा इशारा दिला आहे . अशी मागणी दत्ता वैजनाथ गोरे यांनी व रविराज राजहंस अंधारे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.