लातुर कॉलेज ऑफ फिजीओथेरपि व कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव (NSS) च्या वतीने भौतीकोपचार व नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप शिबीर संपन्न .



 लातुर कॉलेज ऑफ फिजीओथेरपि व कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव (NSS) च्या वतीने भौतीकोपचार व नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप शिबीर संपन्न .


मुरुड प्रतिनिधी( श्रीकांत टिळक):- मुरुड ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामीण रुग्णालय येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लातुर कॉलेज ऑफ फिजीओथेरपि व कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव (NSS) च्या वतीने भौतीकोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. विविध आजारावर भौतीकोपचार

,फिजीओथेरपि तज्ञ डॉक्टरांकडून त्यांचे उपचार करण्यात आले. लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी व कॉलेज ऑफ फार्मसी  हासेगाव यांचे शंभर वॉलेटयर , स्वयंसेवकांनी घरोघर जाऊन या शिबिराचे नियोजन केले असून मुरुड येथील नागरिकांनी या शिबिरास आपली उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली .

तसेच मुरुड शहरामध्ये विविध ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले. मुरुड ग्रामपंचायत कार्यालय येथे नेत्र शिबिरे घेऊन व त्यांच्या माध्यमातून चष्मे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच अमृता नाडे, उपसरपंच हनमंत  नागटिळक , प्रमुख पाहुणे, यांच्या हस्ते करण्यात आले.गावातील नागरिक,ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी उपस्थित होते. 


तसेच लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव  "युथ फॉर माय भारत आणि युथ फॉर डिजिटल लिट्रसी" या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विशेष युवक शिबिराच्या चौथ्या दिवशी अंधश्रद्धा निर्मूलन, बालविवाह प्रतिबंध, स्वामी विवेकानंदांचे विचार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि डिजिटल साक्षरतेवर आधारित जनजागृतीपर सत्रांचे आयोजन करण्यात आले. 

प्रमुख पाहुणे म्हणून मा. अशोक उजगिरे (पोलीस उपनिरीक्षक, मुरुड), मा.भारत सातपुते, माधव बावगे यांनी उपस्थिती दर्शवली. माधव बावगे यांनी अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यासारख्या प्रथा समाजाच्या प्रगतीस अडथळा ठरतात, यावर भर देत युवकांना वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. 

बालविवाह प्रतिबंधाबाबत त्यांनी बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम, शिक्षण व आरोग्यावर होणारे परिणाम स्पष्ट केले आणि शिबिरार्थींना याविरुद्ध सजग भूमिका घेण्याचा सल्ला दिला. भारत सातपुते यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 मधील युवकांसाठी उपलब्ध असलेल्या संधींवर मार्गदर्शन केले आणि शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्यविकासावर भर देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, डिजिटल साक्षरतेवर चर्चा करताना तंत्रज्ञानाच्या योग्य उपयोगामुळे शिक्षण, रोजगार आणि सामाजिक प्रबोधन यामध्ये होणाऱ्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित सत्रामध्ये युवकांनी त्यांच्या शिकवणीचा अभ्यास करण्याचा आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्याचा संदेश दिला, त्याचबरोबर या शिबिरामध्ये लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, लातूर कॉलेज ऑफ नर्सिंग या महाविद्यालयाने मोफत आरोग्य शिबिर आयोजन केले यामध्ये 120 पेशंटची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिबिर अधिकारी प्रा. श्रीनिवास कराड आणि प्रा. स्नेहा वैरागकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या शिबिरासाठी श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेने आयोजित करण्यात आले होते. मुरुड येथील नागरिकांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा ही देण्यात आल्या व  शिबिराचे स्वागत करत अशी शिबिरे आणखीन व्हावे अपेक्षा दर्शवली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post