मुरुडेश्वर मा.विद्यालय येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी..
मुरुड प्रतिनिधी (श्रीकांत टिळक):- दि.१२ रोजी विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष संजय नाडे साहेब व सचिव बी.एन.डोंगरे साहेब यांनी पुष्पहार , पुष्प अर्पण करुन व श्रीफळ वाढवून अभिवादन केले.
विद्यालयाचे मु.अ. फेरे सर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याविषयीचे विचार आपल्या भारदस्त वक्तृत्व शैलीतून व्यक्त केले. *संघर्ष, त्याग, धैर्याचे किर्तीवंत उदाहरण म्हणजे स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब ! स्त्री शक्ती व नेतृत्वाच्या प्रतिक असणाऱ्या जिजाऊंनी शिवरायांच्या मनात स्वराज्याचं बीज पेरलं! छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे रयतेचे आहे, शेतकऱ्यांचे आहे.
तसेच विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका सवासे मॅडम यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विषयी मार्मिक शब्दातून आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमच्या वेळी विद्यालयाचे मु.अ.फेरे सर, पटणे सर, लाड सर, सवासे मॅडम, झाडके मॅडम, सहालूगडे मॅडम, दाणे मॅडम, गायकवाड विकास, गिरी राजेंद्र व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.