लातूर पाेलिसांना सर्वसाधारण विजेतेपद, 29 वी नांदेड परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप.
लातूर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या नांदेड परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत पुरुष गटाचे सर्वसाधारण विजेतेपद (पुरुष) लातूर ला तर महिलांचे सर्वसाधारण विजेतेपद नांदेड संघाने पटकाविले.
गेल्या चार दिवसांपासून लातूर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या 29 वि नादेड परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेचा 7 जानेवारी (मंगळवारी) समारोप झाला. या स्पर्धेत लातूर सह नांदेड, परभणी व हिंगोली असे चार पोलिस संघ दाखल झाले होते.
या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लातूर व नांदेड पोलिस संघांत अटीतटीची लढत सुरू होती.
मंगळवारी स्पर्धेच्या अंतिम दिवशी विजेत्या संघास पारितोषिक वितरण नांदेड परिक्षेत्र चे उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या हस्ते झाले, तर पोलिस अधीक्षक लातूर सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड श्री अबीनाश कुमार पोलीस अधीक्षक परभणी श्री रवींद्र सिंह परदेशी पोलीस अधीक्षक तथा प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर चे विजय मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी समारोपमध्ये नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले की, पोलीस दलात काम करताना बौध्दीक तत्परतेसह शारीरीक कसरत, तंदुरूस्ती असणे गरजेचे आहे. त्यामुळेच पोलीस दलातील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी गुन्हे तपास, कायदा व सुव्यस्था राखण्यासोबतच खेळाच्या व शारीरीक कसरतीच्या माध्यमातून सदृढ शारीरीक व मानसिक तंदुरूस्ती जपणे गरजेचे आहे. आणि त्या करीता प्रत्येकांनीच जमेल तसे वेगवेगळ्या खेळांमध्ये व स्पर्धा मध्ये भाग घेणे गरजेचे आहे.
पोलीस दलाच्या व्यस्ततेतून वेळ काढून स्पर्धेत भाग घेणा-या खेळाडूंनी सरावात भाग घेवून स्वतःला तंदुरूस्त ठेवले आहे. या व्यस्ततेतून कर्तव्याबरोबरच खेळाला प्राधान्य दिल्याबद्दल स्पर्धेत भाग घेणा-या सर्व पूरूष व महिला खेळांडूचे कौतुक व अभिनंदन केले. या स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या पोलीस खेळाडूंना महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा, ठाणे येथे होणा-या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
समारोपिय कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी तर आभार अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांनी व्यक्त केले.
या परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेचे उत्कृष्ठ आयोजन व नियोजन करून स्पर्धा यशस्वी केल्या बद्दल यजमान लातूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधिक्षक, अजय देवरे, पोलीस उप अधिक्षक (मुख्यालय) गजानन भातलवंडे, व ईतर सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष आभार व अभिनंदन मानले.