मुरुड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..
मुरुड प्रतिनिधी (श्रीकांत टिळक):- लातूर तालुक्यातील मुरुड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम मुरुड ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आला होता.
यावेळी जनता विद्या मंदिर चे प्रशासकीय अधिकारी अमर मोरे ,ग्रामपंचायत सदस्य महेश कणसे, ग्रामपंचायत सदस्य सुरज सूर्यवंशी, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष काळे,डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल ग्रुपचे अध्यक्ष सचिन घोडके व उपाध्यक्ष बाबासाहेब टिळक, अविनाश सवाई, विशाल कणसे, आश्रोबा चव्हाण,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र साबळे व कर्मचारी उपस्थित होते.