मुरुड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेयवादामुळे कर्मचाऱ्यांचे व रुग्णांचे जीव धोक्यात..! मुरुड ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची तारेची कसरत..



 मुरुड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेयवादामुळे कर्मचाऱ्यांचे व रुग्णांचे जीव धोक्यात..!

मुरुड ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची तारेची कसरत..

मुरुड :- लातूर तालुक्यातील मुरुड येथील ग्रामीण रुग्णालय याचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयामध्ये झाले आहे.परंतु काही राज्यकीय श्रेयवादामुळे या कामाचे मुहूर्त लागत नसल्याने येथील इमारत कालबाह्य झाल्यामुळे छताचे काही भाग कोसळले असल्यामुळे तेथील कर्मचारी, रुग्ण यांना जीवित हानी होण्याची शक्यता नकारता येत नाही.


मुरुड ग्रामीण रुग्णालयाचे दोन वॉर्ड  मधील बांधकाम झिर्ण अवस्थे मध्ये असून तेथील बांधकाम कालबाह्य झाल्याचे दिसून येत आहे. बांधकामाअभावी येथील काही विभाग पडत आहेत ,तात्पुरती व्यवस्था म्हणून याठिकाणी आरोग्य विभागाच्यावतीने दोन वॉर्डा चे बांधकाम काही वेळा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्यक्षात नवीन इमारतीच्या कामाची सुरुवात करणे गरजेचे आहे. याठिकाणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, शिकाऊ डॉक्टर, कर्मचारी वर्ग व रुग्णांचे जीव धोक्यात असल्याचे चित्र दर्शनात येत आहे.या सर्व अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करतात परंतु मुरुड येथे कार्यरत वैद्यकीय अधीक्षक डॉ. गलांडे यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभाग, आंतर रुग्ण विभाग, डिलेव्हरी वॉर्ड,ऑपरेशन थियेटर तसेच इतर काही भाग ढासळत आल्यामुळे इतरत्व कुठे त्याचे स्थलांतरित करावे असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.


मुरुड ग्रामीण रुग्णालयाची स्थापना दिनांक 30 जुलै 1977 रोजी झाली असून त्याचे उद्घाटन स्वर्गीय.शिवाजीराव भाऊराव पाटील (निलंगेकर) पाटबंधारे व पुनर्वसन मंत्री यांच्या व माननीय नामदार शिवराज पाटील (चाकूरकर) उपसभापती विधान सभा महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली करण्यातआली होती. सदरील सहकार महर्षी शिवाजीराव नाडे, हरिभाऊ नाडे माजी सभापती पंचायत समिती लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली असून तेव्हापासून ते आज पर्यंत 48 वर्ष होऊनही ग्रामीण रुग्णालयाच्या विवाद निर्माण झाला नव्हता.


तसेच राज्यकीय श्रेयवादामुळे इमारतीमधील सामान्य रुग्णाची हेळसांड होताना दिसून येत आहे.नव्याने उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकामाला मुहूर्त लागेना परंतु जीव महत्त्वाचा की श्रेयवाद राजकीय मतभेद बाहेर सोडून रुग्णालयाच्या बाबतीमध्ये सर्व पक्षीय बैठक घेऊन यावर तोडगा काढान रुग्णांना सेवा मिळण्याच्या प्रयत्नाला बळ द्यावी अशी चर्चा नागरिकाची होत आहे.तसेच ग्रामीण रुग्णालय येथील काही विभाग छताचे काही भाग ढासळत आहेत.यामध्ये रुग्णालयातील अधीक्षक यांचा कक्ष कार्यालयातील तीन लिपीक व संणकाचा कक्ष औषधी करिता स्टोअर रुम, रेकॉर्ड रुम, भौतिकोपचार कक्ष, समुपदेशक कक्ष, आय सोलेशन वॉर्ड, निर्लेखित वस्तू ठेवण्याकरिता कक्ष, दंत चिकित्सा अधिकारी, रक्त विभाग, रक्त तपासणी विभाग, रुग्ण तपासणीचा कक्ष, आशा रुम  व्यवस्था आदींचे बांधकाम करणे गरजेचे झाले आहे.रुग्णालयाच्या वार्डा मध्ये अपघाताची शक्यता आहे. सदर ग्रामीण रुग्णालयाला अनेक पदक मिळवून महाराष्ट्र नव्हे तर भारतातील नंबर एक वर असलेले रुग्णालयाची अशी अवस्था असल्याचे निदर्शनात येत आहे.सदर रुग्णालय राष्ट्रीय महामार्गावर असल्याने याठिकाणी अपघाताच्या रुग्णां सोबतच परिसरातील वीस किमी अंतरावरून रुग्णांची गर्दी असते. दररोज 100 ते 150 तर प्रत्येक बुधवारी आठवडी बाजारामुळे  200 ते 300 बाह्य रुग्णांची नोंदणी व उपचार होतात. नुकत्याच झालेल्या एक्सीडेंट मुळे मुरुड खळबळ उडाली आहे याचा बोध घेऊन योग्य ते निर्णय घ्यावे अशी चर्चा नागरिकात दिसून येत आहे.

तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये काही अपुऱ्या सुविधेमुळे काही वेळेस रुग्ण पुढील उपचारासाठी रेफर करावे लागत आहेत. उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर ही वेळ येणार नाही अशी नागरिकात चर्चा होत आहे.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व सार्वजनिक बांधकाम विभागाने व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी. तसेच रुग्णालयाचे नवीन बांधकाम हाती घेण्यात यावे,काही महिला रुग्ण संकोच व्यक्त करीत आहेत, अशी मागणी रुग्ण व कर्मचारी वर्ग, नागरिक करत आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post