हेल्थ इन्श्युरन्सच्या विविध संकल्पनांबाबत
आजच्या काळात हेल्थ इन्श्युरन्स एक महत्त्वाचे आर्थिक आणि आरोग्यसेवा साधन बनले आहे. आरोग्याच्या बाबतीत होणार्या अधिकच्या खर्चासाठी, हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी असणे महत्त्वाचे आहे, यामुळे आपल्याला आर्थिक सहाय्य मिळते आणि खर्च न रोखता संपूर्ण आरोग्यविषयक उपचार करण्यास मदत होते. चला या आर्थिक साधनाविषयी अधिक समजून घेण्यासाठी हेल्थ इन्श्युरन्समधील काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेऊया.
1) सम इन्श्युअर्ड: ही पॉलिसी वर्ष जे सामान्यपणे 1 वर्ष असते त्या दरम्यान तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या एकूण आर्थिक कव्हरची रक्कम आहे, तुम्हाला 5 वर्षांपर्यंत दीर्घ इन्श्युरन्स कालावधी घेण्याचा पर्याय देखील दिला जातो. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सम इन्श्युअर्डची पुरेशी रक्कम घेणे महत्त्वाचे आहे.
2) कव्हरेज: याचा अर्थ पॉलिसी अंतर्गत तुम्हाला उपलब्ध हॉस्पिटलायझेशन उपचार, जसे की इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन कव्हर, मॅटर्निटी कव्हर, ॲम्ब्युलन्स कव्हर, आऊट-पेशंट कन्सल्टेशन, अवयव दाता, मानसिक आरोग्य इत्यादी. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पॉलिसीमध्ये कव्हरेज प्रदान करण्यासाठी तुमची सम इन्श्युअर्ड पुरेशी असावी.
3) प्रीमियम: हा तुमचा हेल्थ इन्श्युरन्स मिळवण्यासाठी तुम्हाला भरावा लागणारा खर्च आहे. हे वय, व्यवसाय, भौगोलिक स्थान, पूर्व-विद्यमान स्थिती, प्रॉडक्टची वैशिष्ट्ये, निवडलेले कव्हरेज इ. सारख्या विविध घटकांवर अवलंबून असते.
4) पॉलिसीधारक/ इन्श्युअर्ड: पॉलिसीमधील वैद्यकीय लाभ प्राप्त करण्यास पात्र असलेल्या व्यक्तीचे नाव पॉलिसी अंतर्गत नमूद केले जाते. फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्यांना देखील कव्हर केले जाते.
5) वजावट: ही फ्लॅट रक्कम किंवा क्लेम रकमेची टक्केवारी आहे जी इन्श्युअर्डला त्याच्या स्वत:च्या खिशातून भरावी लागते, जी सामान्यपणे कस्टमरद्वारे निवडली जाते आणि या रकमेपेक्षा जास्त असलेले सर्वकाही इन्श्युरन्स कंपनीद्वारे कव्हर केले जाईल.
6) को-पे: हे इन्श्युअर्ड त्यांच्या स्वत:च्या खिशातून देय करण्यास सहमत असलेल्या एकूण क्लेम रकमेची टक्केवारी दर्शविते. पॉलिसी खरेदी करताना हा करार केला जातो आणि याचा उद्देश हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे प्रीमियम कमी करणे आहे.
7) फॅमिली फ्लोटर: तुमच्याकडे वैयक्तिक पॉलिसी खरेदी करण्याचा पर्याय आहे जिथे केवळ एक व्यक्ती इन्श्युअर्ड असते किंवा तुम्ही फॅमिली फ्लोटर घेऊ शकता जिथे कुटुंबातील सर्व सदस्यांना एकाच सम इन्श्युअर्ड अंतर्गत पॉलिसीमध्ये कव्हर केले जाते. संपूर्ण कुटुंबाला पुरेसे कव्हर करण्यासाठी वैयक्तिक पॉलिसीच्या 2.5 पट अधिक सम इन्श्युअर्ड असण्याची शिफारस केली जाते.
8) हॉस्पिटलायझेशन: हा हॉस्पिटलमध्ये घेतला जाणारा एक इन-पेशंट उपचार आहे, सामान्यपणे हेल्थ इन्श्युरन्स क्लेम ट्रिगर होण्यासाठी 24 तासांचे हॉस्पिटलायझेशन आवश्यक आहे. 24 तासांच्या इनपेशंट मेडिकल हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसलेल्या काही डेकेअर उपचारांना देखील इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर केले जाते.
9) पूर्व-विद्यमान स्थिती: या इन्श्युअर्डला अगोदरच निदान झालेल्या वैद्यकीय स्थिती आहेत. या स्थितींमुळे होणारे कोणतेही आजार पॉलिसीच्या पहिल्या तीन वर्षांसाठी कव्हर केले जात नाहीत. इन्श्युरन्सचा उद्देश अनपेक्षित, अनियोजित हॉस्पिटलायझेशनसाठी आर्थिक संरक्षण प्रदान करणे आहे. पूर्व-विद्यमान स्थिती सूचित करतात की या आजारांमुळे भविष्यातील हॉस्पिटलायझेशनच्या शक्यतेची तुम्हाला माहिती आहे.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आता कोणत्याही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमधील महत्त्वाच्या संकल्पनांविषयी माहिती मिळाली आहे. ही माहिती तुम्हाला तुमची पॉलिसी चांगल्याप्रकारे समजून घेण्यास मदत करेल, ज्यामुळे तुम्ही एक सक्षम खरेदीदार बनाल. इन्श्युरन्स करार त्याच्या कायदेशीर संकल्पनांमुळे जटिल असू शकतो, परंतु सुलभ माहिती असल्याने तुम्हाला तुमच्या इन्श्युरन्स कालावधीमध्ये अधिक माहितीपूर्ण आणि चांगल्या स्थितीत राहता येईल.
लेखक: भास्कर नेरुरकर, हेड- हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स
No comments:
Post a Comment