लातूर :- सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या अमृमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे ( महिला व पुरुष ) आयोजन लातूर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोशिएशन,लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
त्या संदर्भात लातूर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोशिएशन,लातूर चे अध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोईज भाई शेख यांच्या उपस्थितीत नियोजन संदर्भातील बैठक संपन्न झाली.
या वेळी असोशिएशन चे दत्ता सोमवंशी, सोनू डगवाले, महेश पाळणे, विक्रम पाटील, मुजीब सय्यद, नसिर फुलारी, नागेश जोगदंड, कृष्णा पोतदार, विजय सोनवणे, माधव लवटे, अझम पठाण दैवशाला जगदाळे, गणेश कोल्हे, सोनू सोमवंशी, शाहबाझ पठाण, रणजीत राठोड, सुनील मुनाळे, लिंबराज बिडवे, डॉ.कैलास पाळणे, विठ्ठल कवरे, सादिक तांबोळी, सय्यद गब्बर, सरफराज शेख, ओवेज खान, बिलाल काझी, सोहम राठोड, माजीद पठाण, शेख रियाज उपस्थित होते.