डॉ. आदित्य पतकराव यांना रेल्वे संघर्ष समिती,मुरुड ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार..
मुरुड प्रतिनिधी (श्रीकांत टिळक):- लातूर- मुंबई व हरंगुळ -पुणे या सह मुरुड वरून जाणाऱ्या सर्व गाड्यांना मुरुड येथे थांबा देण्यात व रेल्वे स्टेशन येथे ऑपरेटिंग स्टेशन व लुपलाईन तसेच प्लॅटफॉर्मची उंची व लांबी तसेच विविध मागण्याचे निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
डॉ. आदित्य पतकराव (केंद्रीय प्रादेशिक सदस्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटका ,मध्य रेल्वे. भारत सरकार) यांनी मुरुड येथील रेल्वे स्टेशनला भेट देऊन सदरील रेल्वे स्टेशन बद्दलच्या उपाय योजनाबद्दल चर्चा केली. मुरुड हे गाव पन्नास हजार लोकसंख्येचे असून मोठी बाजारपेठ मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संकुल व आरोग्य सुविधा असल्यामुळे आजूबाजूच्या 40 ते 50 गावांचा सदरील मुरुड शहराशी दररोजचा संपर्क असून मुरुड वरून पुणे मुंबई ला जाण्यासाठी रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यास मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करू शकता. त्यामुळे लातूर- मुंबई व हरंगुळ -पुणे या सह मुरुड वरून जाणाऱ्या सर्व गाड्यांना मुरुड येथे थांबा देण्यात यावा. तसेच मुरुड रेल्वे स्टेशन येथे ऑपरेटिंग स्टेशन व लुपलाईन तसेच प्लॅटफॉर्मची उंची व लांबी वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली असून सदरील मागणी संदर्भात यावर डॉ. आदित्य पतकराव यांना रेल्वे संघर्ष समिती, मुरुड च्या वतीने निवेदन देण्यात आले.
त्या अनुषंगाने सदरील विषय केंद्रीय रेल्वे मंत्री मा. अश्विनी वैष्णव व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या कार्यालयाला ताबडतोब पत्र व्यवहार करून लवकरात लवकर सदरील विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले. त्यानंतर विश्रामगृह मुरुड या ठिकाणी डॉ.आदित्य पतकराव यांचा ग्रामपंचायत मुरुड विविध संघटना व रेल्वे संघर्ष समिती च्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हनुमान बापू नागटिळक (उपसरपंच ग्रामपंचायत, मुरुड) बी एन डोंगरे (चेअरमन, दूधगंगा व्यवसायिक संस्था, मुरुड) डॉ. हनुमानदास चांडक डॉ. बजरंग खडबडे एड. विजय कनकधर प्रवीण सुरवसे (मा. जिल्हा परिषद सदस्य) अक्षय चव्हाण (मा. ग्रामपंचायत सदस्य) विष्णू घुटे (तालुका उपप्रमुख- शिवसेना उबाठा ) अर्जुन टिळक,सतीश मिसाळ, मोहित डोळसे ,जितेंद्र पांगळ, गोविंद घुटे, सौरभ शिंदे, पिल्लू भोसले, हनुमंत भोसले यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते .