बीडमध्ये ईद सणाला गालबोट, भयंकर स्फोटाने हादरली मशीद

 

बीडमध्ये ईद सणाला गालबोट, भयंकर स्फोटाने हादरली मशीद


बीड: मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात विविध गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. अलीकडेच बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आलीय. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख यांच्यानंतरही बीड शहरासह जिल्ह्यात अनेक गुन्हेगारी बातम्या समोर आल्या आहेत. आता पुन्हा एका बीडला हादरवणारी घटना समोर आली आहे.

शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास बीडच्या अर्धामसला गावात मशिदीत स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ऐन रमझानमध्ये मशिदीत अशाप्रकारे स्फोट घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांचं पथक घटनास्थळी रवाना झालं आहे. हा स्फोट नेमका कुणी घडवला आणि कसा घडला? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

एका माथेफिरूने हा स्फोट घडवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र हा स्फोट घडवण्यामागे आरोपीचा काय हेतू होता. त्याच्याकडे ही स्फोटकं कुठून आली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मशिदीचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. जिथे स्फोट घडला, त्या भागातील मशिदीतील फरशी फुटली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post