Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी

     दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी







    🔎 धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, छातीला मार :


    राष्ट्रवादी काँग्रेसचे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. परळीकडे जात असताना धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात  झाल्याची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्याचं फेसबुक पोस्टमधून धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. या अपघातात छातीला किरकोळ मार लागल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमधून दिली. 


    💁‍♂️ आंबेडकर-शिवसेनेत युतीची चर्चा सुरू : संजय राऊत :


    प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेत युतीची चर्चा सुरू आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत आल्यास राज्यासह देशात परिवर्तन दिसेल असे सांगताना मविआला या चर्चेची पूर्ण कल्पना आहे. कुणाचा विरोध आहे कुणाचा नाही हे भविष्यात कळेल. मला असे वाटत नाही प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात एकवटले आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यापासून कुणी रोखणार नाही, असेही त्यांनी म्हटले.


    🗣️ उर्फी जावेद प्रकरणात महिला आयोगा गप्प का? : 


    'भाषा नको तर कृती हवी.. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे @Maha_MahilaAyog समर्थन करतंय का ? भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये. महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत जाब का नाही विचारला? विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे. आणि हो… कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही ? #सामाजिकभान #स्वैराचारालाविरोध.' अशी टीका भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.


    😎 देशात साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ :


    देशात सध्या उसाचा गळीत हंगाम सुरु आहे. हंगाम सुरु असतानाचं एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झालीय. या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) देशातील साखरेचं उत्पादन 120 लाख टनांवर गेलं आहे. यावरुन देशातील साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचं समजतंय. देशातील विविध राज्यात साखरेचं मोठं उत्पादन झालं आहे. त्यामुळं सध्या साखरेचा विक्रमी साठा झालाय. विविध पिकांच्या उत्पादनात भारताचा जगातील अव्वल देशांमध्ये वरचा क्रमांक लागतो. 


    🏥 रिषभ पंतवर पुढील उपचार आता मुंबईत होणार :


    भारतीय संघाचा स्टार खेळाडू रिषभ पंत याच्यावर आता पुढील उपचार मुंबईत केले जाणार आहेत. 30 डिसेंबरला रिषभ कार अपघातात गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्यावर देहराडून येथे उपचार सुरू आहेत.  रुरकीजवळ कार अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. मात्र आता दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) मोठा निर्णय घेतला आहे. DDCA पंतला उपचारासाठी मुंबईला घेऊन जाणार आहे. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad