दिवसभरातील ताज्या घडामोडी
दिवसभरातील ताज्या घडामोडी
💥 हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. आज पहाटेच ईडीच्या 4 ते 5 अधिकाऱ्यांनी कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळाप्रकरणी मुश्रीफ यांच्या घराची ईडीकडून झाडाझडती घेतली जात आहे.
😷 गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, नीती आयोगाचं आवाहन :
सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून ICMR नं हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. दरम्यान गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे.
💰 प्रत्यक्ष कर संकलनात केंद्राची मोठी उडी :
प्रत्यक्ष कर संकलनात केंद्र सरकारने मोठी उडी घेतल्याचे चित्र आहे. 2022-23 या आर्थिक वर्षातील 10 मार्चपर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाचे आकडे वित्त मंत्रालयाने जाहीर केले आहेत. या आकडेवारीत वाढ होताना दिसत असून, जाहीर आकडेवारीनुसार सरकराने 10 मार्चपर्यंत प्रत्यक्ष कर संकलाद्वारे 16.68 लाख कोटी जमा केले आहेत, अशी माहिती CBDT ने जारी केली आहे.
👀 लालू-राबडी देवी यांच्यानंतर तेजस्वी यादव यांचा नंबर :
जमीन-नोकरी घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढत आहेत. सीबीआयनं यापूर्वी लालू यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी (यांची चौकशी केली होती. तर आता सीबीआयनं आपला मोर्चा लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्याकडे वळवला आहे. या प्रकरणी सीबीआयनं तेजस्वी यादवला दुसऱ्यांदा समन्स पाठवलं आहे.
🔎 सतिश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद? :
अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूचा तपास करत असलेले पोलीस शनिवारी दिल्लीतील फार्म हाऊसवर पोहोचले. कौशिक यांनी मृत्यूच्या एक दिवस आधी येथे होळी पार्टीला हजेरी लावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फार्म हाउसच्या झडतीमध्ये पोलिसांना काही औषधे सापडली. पोलिसांना फार्म हाऊसच्या मालकाची चौकशी करायची होती, मात्र तो फरार आहे.
No comments