दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
⛈️ राज्यावर अवकाळीचे संकट; पुढील 3 दिवस... :
राज्यात अवकाळी पावसाचे संकट उभे ठाकले आहे. आजपासून 18 मार्चपर्यंत मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकणात वीजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागात गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
👀 राज्यात H3N2 विषाणूचा स्फोट, 352 रुग्ण आढळले :
आता राज्यासह देशात H3N2 या नव्या विषाणूनं डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. भारतात आतापर्यंत यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. यातील एक मृत्यू राज्यातील नगरमधील आहे. नव्या विषाणुच्या वाढत्या रूग्णसंख्येने प्रशासनासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
👀 मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून पवारांचा संताप अनावर :
यांना जनाची नाही तर मनाचीही लाज वाटत नाही का? हा निर्लज्जपणाचा कळस आहे. सत्ताधारी आमदारांना गांभीर्य नसून हा गलिच्छपणा असल्याची टीका अजित पवार यांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज 7 मंत्री अनुपस्थित असल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा संताप अनावर झाला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिलगिरी व्यक्त केली.
😎 संजय राऊत यांची जोरदार टोलेबाजी, म्हणाले.. :
राज्यात सध्या मुका घ्या मुका सिनेमा सुरु आहे. मात्र या प्रकरणामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करत आहे. त्यांचा काय संबंध आहे. सार्वजनिक कार्यक्रमात मुका घ्यायला आम्ही सांगितले होते का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फ व्हिडीओ प्रकरणावरुन संजय राऊत यांनी निशाणा साधला.
💐 'नुक्कड'मधील 'खोपडी' काळाच्या पडद्याआड :
दूरदर्शनवरील गाजलेली मालिका 'नुक्कड'मध्ये खोपडी ही व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. समीर खक्कर यांनी त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. पण ते ‘नुक्कड’ या टीव्ही मालिकेतील खोपडी या भूमिकेसाठी विशेष ओळखले जायचे. खक्कर तब्बल 38 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत होते.

No comments