पोकळ भाषणांनी पोट भरत नाही;विकासासाठी कृती हवी - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर
पोकळ भाषणांनी पोट भरत नाही;विकासासाठी कृती हवी
- डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर
लातूर/प्रतिनिधी: लातूरकरांची स्वप्न खूप मोठी आहेत.शहरात समस्यांचे डोंगर उभे आहेत.अशा स्थितीत पोकळ भाषणे करून चालत नाही तर विकासासाठी प्रत्यक्ष कृती आवश्यक असते, असे प्रतिपादन भाजपा महायुतीच्या लातूर शहर मतदारसंघातील उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले.
शहरातील चन्न बसवेश्वर फार्मसी महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमात डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर बोलत होत्या. या कार्यक्रमास भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, भीमाशंकर देवणीकर,संस्थेचे विश्वस्त विजयकुमार मठपती, बालाजी शेळके,संचालक हलकुडे अप्पा,अनुप देवणीकर, संजय गीर,मीनाताई गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की.साहेबांची स्वप्ने साकार करू,असे लातूरचे आमदार नेहमीच आपल्या भाषणात म्हणतात.साहेबांची तर होतीच पण लातूरकरांचीही असंख्य स्वप्न आहेत.ही स्वप्न केंव्हा साकार करणार ? पोकळ भाषणे करून चालत नाही. त्यासाठी प्रत्यक्षात कृतीही करावी लागते.ही कृती झाल्याचे आजपर्यंत तरी दिसले नाही,
असेही अर्चनाताई म्हणाल्या.
विद्यार्थी आता मतदार झाले आहेत.या नव मतदारांनी लोकशाही समृद्ध करण्यासाठी मतदान करावे.भाजपाला साथ द्यावी,असे आवाहनही डॉ. अर्चनाताई पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी विद्यार्थ्यांची मनेही जिंकली.
यावेळी बोलताना अजित पाटील कव्हेकर यांनी अर्चनाताई पाटील अनेक दिवसांपासून समाजकारणात सक्रिय आहेत. लातुरसाठी त्या नव्या नाहीत असे सांगितले.लातुरचे युवराज घोषणा करतात पण त्या प्रत्यक्षात उतरत नाहीत. उजनीच्या पाण्याचेही असेच झाले.ते धाराशिवपर्यंत आले पण लातूरला पोहोचू शकले नाही. आपले आमदार त्यासाठी कमी पडल्याचेही अजित पाटील म्हणाले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
No comments