विनोद तावडेंनी पैसे वाटले, हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप

 




 विनोद तावडेंनी पैसे वाटले, हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप

मुंबई : विधानसभा निवडणुकीला एक दिवस बाकी असताना राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. विवांत या हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केले आहेत. विनोद तावडे पैशांच्या बॅग घेऊन हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांना पैसे वाटत असल्याचा आरोप करत बविआ एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना घेरलं असून भाजप आणि बविआ कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित आहेत. विनोद तावडे यांना लाज वाटायला पाहिजे. माफ करा जाऊन द्या, असं म्हणत त्यांनी मला २५ फोन केले. जे नियमाने आहे तशी कारवाई करावी. मला अगोदरच बातमी समजली होती की तावडे ५ कोट रूपये घेऊन येणार आहेत. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना बोलवल्याचं क्षितिज ठाकूर यांनी सांगितलं.

विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये आहेत त्या ठिकाणी बविआच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातलेला आहे. तावडे आता दुसऱ्या मजल्यावर असून खाली भाजप आणि बविआचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. विनोद तावडे यांच्यावर कारवाई करावी अन्यथा उद्या सहा वाजेपर्यत त्यांना सोडणार नसल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post