महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीनंतर 70 लाख नवे मतदार कुठून आले? राहुल गांधींचा प्रश्न

महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीनंतर 70 लाख नवे मतदार कुठून आले? राहुल गांधींचा प्रश्न


महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केला आहे.

लोकसभेत इंडी आघाडीला यश मिळाले आणि सहा महिन्यांनी विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत अचानक 70 लाख मतदार कसे वाढले? असा प्रश्न त्यांनी लोकसभेत विचारला. तसेच शिर्डीमध्ये एकाच इमारतीत 7 हजार नवे मतदार यादीमध्ये समाविष्ट कसे झाले? असंही त्यांनी विचारलं.

काल 4 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी चेतन चंद्रकांत अहिरे यांची ही रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे.

भारतीय संघ, भारतीय निवडणूक आयोग, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी या याचिकेतील प्रतिवादी आहेत.

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांची फसवणूक झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
फोटो कॅप्शन,काँग्रेसचे सांख्यिकी विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत म्हणजे 2019 ते 2024 या काळात मतदारांची संख्या 32 लाखांनी वाढली, मग लोकसभा निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्याच्या कालावधीत विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदारांची संख्या 48 लाखांनी कशी वाढली? असा प्रश्न आता काँग्रेसने उपस्थित केला आहे.

राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त काँग्रेसकडून पुन्हा एकदा मतदार यादीत त्रूटी असल्याचं सांगत टीका करण्यात आली आहे. तसंच महाविकास आघाडीच्या 100 पराभूत उमेदवारांनी यासंदर्भात विविध न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.

यावर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "काँग्रेसचं असं झालंय की नाचता येईना आंगण वाकडं. तुम्ही पराभव स्वीकारा. लोकसभेत आम्ही असं काही ओरडत फिरलो का? मतदान कमी झालं, मशीन खराब झालं. तुम्ही रडतच बसलात. लोकसभेत, विधानसभा, जिल्हापरिषद जसजशी निवडणूक स्थानिक होत जाते मतदान वाढत जातं. आजपर्यंतची आकडेवारी पाहा."विधानसभेत वाढीव 48 लाख मतदारांमुळेच महायुतीचा विजय झाला असून या 48 लाख वाढीव मतदारांच्या नोंदणीबाबत काँग्रेसने संशय व्यक्त करत निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊया.

Post a Comment

Previous Post Next Post