आरोग्य विमा संज्ञा: को-पे वि. वजावट
-
आजच्या धकाधकीच्या आणि बैठी जीवनशैलीमध्ये, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याची शक्यता वाढली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमुळे तुमच्या कष्टाने कमावलेली बचत लवकर संपुष्टात येऊ शकते आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. परिणामी, तुमच्या आरोग्यसेवेच्या गरजा आणि बजेटसाठी अनुकूल असलेली सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसी निवडणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही पहिल्यांदा योजना खरेदी करीत असाल तर तुम्हाला काही तांत्रिक संज्ञांविषयी स्पष्टता हवी. कोणतेही गैरसमज टाळण्यासाठी या संज्ञा जाणून घेणे नेहमीच फायदेशीर ठरते. अशा दोन संज्ञा म्हणजे ''को-पे'' आणि ''वजावट''.
आता को-पे आणि वजावट समजून घेऊया:
को-पे: को-पे ही रक्कम आहे, जी पॉलिसीधारक म्हणून, वैद्यकीय खर्चाच्या क्लेम सेटलमेंटसाठी तुम्हाला देय करणे आवश्यक आहे. विमा कंपनी उर्वरित रक्कम कव्हर करते. सामान्यपणे, को-पे रक्कम ही एकूण खर्चाची निश्चित टक्केवारी असते. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 20% को-पे टक्केवारी असेल आणि वैद्यकीय प्रक्रियेचा खर्च रु.1,00,000 असेल तर तुम्हाला रु. 20,000 भरावे लागतील, तर विमा प्रदाता उर्वरित रु. 80,000 कव्हर करेल. काही प्रकरणांमध्ये, को-पे टक्केवारी ऐवजी निश्चित रक्कम असू शकते. को-पे असण्याचा प्रमुख फायदा म्हणजे ते तुम्हाला तुमची हफ्ता रक्कम अनुकुलित करण्यास मदत करू शकते. कपात थेट तुमच्या को-पे च्या वाट्याशी संबंधित आहे. जास्त को-पे टक्केवारी म्हणजे कमी हफ्ता, परंतु जर तुम्ही ती रक्कम भरण्यास आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर असाल तरच जास्त को-पे निवडा.
वजावट: वजावट ही अशी रक्कम आहे जी तुम्ही, पॉलिसीधारक म्हणून, आरोग्य विमा संरक्षण सुरू होण्यापूर्वी तुमच्या खिशातून देय करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर तुमची वजावट रु. 25,000 असेल आणि तुमचा रु. 70,000 पर्यंत वैद्यकीय खर्च झाला तर तुम्हाला तुमच्या खिशातून पहिले रु. 25,000 भरावे लागतील. त्यानंतर, विमा प्रदाता उर्वरित रु. 45,000 कव्हर करेल. एकदा तुम्ही वजावटीच्या मर्यादेपर्यंत वैद्यकीय खर्च भरल्यावर, विमा प्रदाता त्यानंतर खर्च कव्हर करणे सुरू करेल. को-पे प्रमाणेच, वजावट असल्याने तुमची हफ्ता रक्कम अनुकुलित करण्यास मदत होऊ शकते. जर तुम्ही एकाची निवड केली तर तुम्ही जास्त वजावट भरण्यासाठी आर्थिकदृष्ट्या तयार आहात याची खात्री करा. को-पे पेक्षा वजावटीचा फायदा म्हणजे तुम्हाला नेहमीच माहित असते की आरोग्यसेवा घटनेच्या बाबतीत तुम्हाला किती देय करावे लागेल.
को-पे चे लाभ:
• अंदाजित खर्च: को-पे ही डॉक्टरांच्या भेटी किंवा प्रीस्क्रिप्शन सारख्या आरोग्यसेवा सेवांसाठी तुम्ही भरत असलेली ठराविक रक्कम आहे. ते तुम्हाला अंदाजित खर्च प्रदान करून तुमच्या वैद्यकीय खर्चाची योजना करण्यास मदत करतात. याचा अर्थ तुम्ही तुमचे आर्थिक व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करू शकता आणि अनपेक्षित शुल्काची चिंता न करता तुम्हाला आवश्यक आरोग्यसेवा प्राप्त करू शकता.
• उपलब्धयोग्यता: को-पे सामान्यपणे कमी असतात, ज्यामुळे नियमित काळजी आणि प्रतिबंधात्मक सेवांची उपलब्धता अधिक परवडणारी बनते. हे तुम्हाला जास्त खर्चाशिवाय आवश्यक वैद्यकीय उपचार मिळवण्यास मदत करते. नियमित तपासणी आणि प्रतिबंधात्मक काळजी अधिक व्यवस्थापित बनतात, तुम्हाला निरोगी राहण्यासाठी आणि लवकरात लवकर समस्या समजण्यास प्रोत्साहित करते.
• प्रतिबंधात्मक सेवांच्या वापरास प्रोत्साहित करते: तपासणी किंवा लसीकरण यासारख्या सेवांसाठी खर्च कमी करते म्हणजे तुम्हाला प्रतिबंधात्मक काळजी मिळण्याची अधिक शक्यता असते. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या लवकर ओळखता येतात, ज्यामुळे वेळीच उपचार करता येतात आणि आरोग्याचे परिणाम अधिक चांगले मिळू शकतात.
• हफ्त्यावर सवलत: विशिष्ट टक्केवारीचे स्वैच्छिक को-पेमेंट निवडणे, जे प्रत्येक क्लेमवर लागू केले जाऊ शकते, विमाधारकास त्यांच्या हफ्त्याच्या किंमती संबंधित टक्केवारीने कमी करण्याची लवचिकता देते. हे विमाधारकांना त्यांचा विमा त्यांच्या बजेटनुसार तयार करण्याचे सामर्थ्य देते, ज्यामुळे त्यांना अद्याप आवश्यक काळजी प्राप्त होईल याची खात्री होते आणि विमा प्रदाता उर्वरित रक्कम कव्हर करते, परवडणारी क्षमता आणि संरक्षण प्रभावीपणे संतुलित करते.
वजावटीचे लाभ:
• खर्च सामायिकरण: वजावट ही अशी रक्कम असते जी तुम्ही तुमचा विमा खर्च कव्हर करणे सुरू करण्यापूर्वी खिशातून भरता. हे तुमचे मासिक हफ्ता कमी ठेवण्यास मदत करते. वजावट भरून, तुम्ही तुमच्या विमा कंपनीसह तुमच्या आरोग्यसेवेचा खर्च सामायिक करता, ज्यामुळे तुमचे संरक्षण राखणे अधिक परवडणारे बनते.
• जोखीम व्यवस्थापन: जास्त वजावट अनेकदा कमी हफ्ता खर्चासह येतात. जर तुम्ही सामान्यपणे निरोगी असाल आणि अनेक वैद्यकीय खर्चाची अपेक्षा करत नसाल तर हे फायदेशीर ठरू शकते. जास्त वजावटीची योजना निवडण्याचा अर्थ असा की जर तुम्हाला वारंवार वैद्यकीय सेवेची आवश्यकता नसेल तर तुम्ही दर महिन्याला कमी देय करू शकता, व पैसे वाचवू शकता.
• खर्चावर नियंत्रण: तुम्हाला वजावटीची पूर्तता करण्याविषयी माहिती असल्याने तुम्ही तुमच्या आरोग्यसेवा खर्चाबद्दल अधिक जागरूक होऊ शकता. तुम्ही किफायतशीर उपचार आणि सेवा शोधण्याची अधिक शक्यता असू शकते. हे तुम्हाला तुमच्या आरोग्यसेवाविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास प्रोत्साहित करते, ज्यामुळे तुम्हाला तुमचे खर्च अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत होते.
को-पे आणि वजावट दोन्ही तुमचे आरोग्य विमा हफ्ता कमी करू शकतात, परंतु याचा अर्थ असा देखील आहे की तुम्ही वैद्यकीय खर्चासाठी खिशातून अधिक देय कराल. आरोग्य विमा योजना निवडताना या संज्ञा समजून घेणे आणि त्यांना लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. फरक जाणून घेणे तुम्हाला तुमच्या आरोग्यसेवेचा खर्च व्यवस्थापित करण्यास आणि तुमच्या संरक्षणाविषयी चांगले निर्णय घेण्यास मदत करते. त्यामुळे, सुज्ञपणे निवडा, निरोगी राहा!
लेखक : श्री. भास्कर नेरुरकर, हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स
No comments:
Post a Comment