https://www.amazon.in/bb/registration/start/?_encoding=UTF8&ref_=cct_cg_12345_1a1&pf_rd_p=9acff4bf-eee0-4854-9cca-99af421dadcf&pf_rd_r=HJNTZM43QKTMGKZ3FXDN

मुरुड ग्रामपंचायत सरपंच श्रीमती अमृता अमर नाडे यांचा लोकसेवेचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरव .

 





मुरुड ग्रामपंचायत सरपंच श्रीमती अमृता अमर  नाडे यांचा लोकसेवेचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरव .


श्रीकांत टिळक

मुरुड  दि. १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करणाऱ्या सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांना पालकमंत्री मंत्री ,शिवेंद्रराजे भोसले,जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांच्या हस्ते गौरवविण्यात आले.

जिल्हा परिषद लातूर यांच्या मार्फत साल - सन २०२४-२५ या वर्षात दिला जाणारा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २००५ नुसार विहीत कालावधित महाराष्ट्रात सर्वाधिक सेवा पुरवल्या बद्दल ग्रामपंचायत कार्यालय मुरुड च्या सरपंच मा. श्रीमती अमृता अमर  नाडे यांचा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना. शिवेंद्रराजे भोसले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मिना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.स) बाळासाहेब वाघ यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मुरुड ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामपंचायत अधिकारी मा. एस.एस. यशवंते उपस्थित होते. 





सदरील उपक्रमासाठी ग्रामपंचायत मधुन देण्यात आलेल्या विविध ऑनलाईन दिल्या जाणार्‍या सुविधा,जन्म दाखला, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी विविध ऑनलाईन प्रमाणपत्रे, नाहरकत प्रमाणपत्र सर्वाधिक असल्याने  मुरुड ग्रामपंचायत चा सत्कार करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments